2 मुलांशी ‘संबंध’ ठेवल्यामुळं गेली होती शिक्षिकेची ‘नोकरी’, आता मिळाले 6 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका प्रायमरी स्कुलच्या महिला टीचरला 2 मुलांसोबत संबंध ठेवण्यासंदर्भात नोकरीवरून काढण्यात आलं होतं. परंतु आता मात्र या शिक्षिकेला नुकसान भरपाई म्हणून सुमारे 6.4 कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटनच्या पोर्ट टालबोटमधील ही घटना आहे.

एका रिपोर्टनुसार, टीव्हीन प्रायमरी स्कुलमध्ये शिकवणाऱ्या मैथ्यू एपलिननं डेटींग अ‍ॅपद्वारे 17 वर्षीय 2 मुलांसोबत ओळख केली. त्यांचे संबंधही होते. शाळेतील प्रशासकांनी हे चुकीच म्हणत तिला नोकरीवरून काढून टाकलं. या शिक्षिकेवर शाळेकडून आरोप करण्यात आले की, तिच्या वर्तणुकीमुळे शाळेची बदनामी होऊ शकते आणि हेड टीचरनं असं करणं चुकीचं आहे असं म्हटलं गेलं.

परंतु एका ट्रिब्यूनलला शिक्षिकेचा दावा खरा असल्याचे आढळले तिच्यासोबत सेक्शुअल ओरिएंटेशनच्या आधारावर भेदभाव करण्यात आला आहे आणि तिला नोकरीवरून कमी करणं चुकीचं आहे.

ट्रिब्यूनलच्या निर्णयाविरोधात शाळेच्या प्रशासनानं अपील केलं. परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली. आता ट्रिब्युनलनं शाळेनं महिलेला सुमारे 6.4 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

ट्रिब्युनलनं आपल्या निर्णयात म्हटलं की, “शिक्षिकेच्या व्यवसायात असल्या तरी त्यांना खासगी आयुष्य जगण्याचा हक्क आहे. शिक्षिकेला नोकरीवरून काढण्यासाठी स्थानिक एज्युकेशन ऑथोरिटीला राजी करण्यासाबद्दलही ट्रिब्यनलनं शाळेतील प्रशासनावर टीका केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like