महिलेकडे सेक्सची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा तुझे छायाचित्र व्हायरल करेन, अशी धमकी देऊन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर कोलटक्के असे त्याचे नाव असून अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरवडी येथील जिल्हा परिषद शाळेवरील तो प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. न्यायालयाने आरोपीला २९ ऑक्टोबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुधीर कोलटक्के याने एका ३५ वर्षीय महिलेसोबत जवळीक साधली. तू माझ्यासोबत मैत्री कर, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करुन बदनामी करेन अशी धमकी तो पीडितेस देत होता. बदनामी टाळायची असल्यास शरीरसुख देण्याची मागणी कोलटक्केने केली. तसेच त्याने तिचा विनयभंग सुद्धा केला, अशी तक्रार पीडित महिलेने अकोट ग्रामीण पोलिसांत दिली. पोलिसांनी सुधीर कोलटक्के यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केला.

सुधीर कोलटक्के यास अमरावती येथील वीर तानाजी कॉलनी व्ही.एम.व्ही.रोड येथून अटक करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनुराधा पाटेखेडे करीत आहेत.

You might also like