मुलाला शाळेत आठवले ’बसपन’चे प्रेम; 90 लाख लोकांनी पाहिला ‘जानेमन’ची आठवण काढणार्‍या मुलाचा Video

नवी दिल्ली : Baspan ka Pyar | बालपणीचे प्रेम तर खुप क्यूट असते. मुलांच्या निष्पापतेशी संबंधीत हे प्रेम एका मुलाने व्यक्त केले, जे आतापर्यंत लाखो लोकांनी ऐकले आहे. सोशल मीडियावर सध्या बसपन का प्यार (Baspan ka Pyar) ट्रेंड करत आहे. या मुलाने शाळेतच आपल्या प्रेमाची आठवण काढत गाणे गायले, जे वायरल झाले आहे. इंस्टाग्राम (Instagram Trending Video) वर तर या गाण्यासोबत आतापर्यंत हजारो रिल्स बनवून अपलोड करण्यात आले आहेत.

व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचे शर्ट घातलेला मुलगा गाणे गाताना दिसत आहे. अतिशय गंभीर चेहर्‍यासह मुलगा आपल्या जानेमनला बालपणीचे प्रेम कधी विसरू नको असे सांगताना दिसत आहे. आपल्या प्रेमासारखे प्रेम इतर कुणीही करणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. पाठीमागे एक टीचर चेयरवर गाणे ऐकून हसताना दिसत आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे हा निष्पाप मुलगा बचपन का प्यार ऐवजी बसपन का प्यार बोलत आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखोवेळा पाहिला गेलाय. इंस्टाग्रामवर या ऑडिओवर अनेक लोकांनी रिल बनवून शेयर केला आहेत. हे गाणे सध्या ट्रेंड करत आहे. मात्र, हा मुलगा कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि हा व्हिडिओ कधी रेकॉर्ड करण्यात आला, हे सर्व स्पष्ट झालेले नाही. मात्र, लोक हा व्हिडिओ खुप पसंत करत आहेत.

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion | राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे ; काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू?

Pimpri Crime | सेट्रींगचे काम करताना चौथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  school kid singing baspan ka pyar love song goes viral on instagram flooded with reels

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update