10000 लाच घेताना शाळेचा मुख्याध्यापक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – कामाचा धनादेश देण्याकरीता 10 हजारांची लाच घेताना माध्यमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला. ही घटना (एंबुर ऐरंबी, पो. दुर्वेस, ता. जि- पालघर) येथे बुधवारी (13 नोव्हेंबर) रोजी घडली. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुमार वामन पष्टे (वय-56) असं आरोपीचं नाव आहे. 10 हजारांची लाच घेताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

34 वर्षीय तक्रारदाराने आश्रमशाळेचा ध्वजस्तंभ व त्याच्यालगत पेवरब्लॉकचे काम केले होते. त्या कामाचा 65 हजारांचा धनादेश होता. सदर धनादेश देण्याकरीता आरोपीनं 10 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. आरोपीनं 10 हजाराची रक्कम पंचासम स्विकारली. यानंतर सदर आरोपी मुख्याध्यपाकाला ताब्यात घेण्यात आलं.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे), अपर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे  (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक कलगोंडा हेगाजे, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, पोलीस नाईक सुवारे, पोलीस नाईक सुतार, पोलीस नाईक पालवे, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सुमडा, पोलीस कॉन्स्टेबल उमतोल, महिला पोलीस नाईक मांजरेकर, चालक पोलीस शिपाई दोडे यांनी केली.

नागरिकांना आवाहन –

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

(अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे, कॅम्प पालघर)

दुरध्वनी क्रं. 02525-297297
मोबा.क्रं.9552250404
टोल फ्रि क्रं. 1064

Visit : Policenama.com