home page top 1

बंदुकीतून सुटलेल्या छर्ऱ्याने शाळकरी नेमबाज जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – शाळेत एअरगन शुटींगचा सराव करताना अचानक बंदुकीतून सुटलेली गोळी (छर्रा) टार्गेटवरून माघारी येऊन पुन्हा नेमबाजाला लागल्याने शाळकरी मुलगा जखमी झाल्याचा प्रकार निफाड येथे समोर आला आहे.

प्रसाद देवीदास बैरागी (वय १४, निफाड) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

प्रसाद हा नेवासा येथील सैनिकी शाळेत शिकण्यास आहे. तो आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. नुकतीच त्याने आठवीची परीक्षा दिली आहे. मागील वर्षभरापासून तो एअरगन शुटींग स्पर्धेत सहभागी होता. त्याने जिल्हा, विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्णपदकही पटकावले आहे. दरम्यान तो उन्हाळी सुट्ट्यांमध्ये निफाडला घरी आला आहे. गुरुवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे शुटींगचा सराव करत असताना बंदुकीतून सुटलेला छर्रा समोरील अडथळ्यावर आदळून पुन्हा माघारी फिरल्याने प्रसादच्या छातीला लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थीर आहे.

Loading...
You might also like