‘कोरोना’मुळे पहिली ते आठवीची शाळा 31 मार्चपर्यंत राहणार बंद; ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगासह देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढत असून, रुग्णांचा आकडा 96,08,211 वर पोहोचला आहे.

देशात मागील 24 तासात कोरोनाग्रस्तांचे 36,652 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 512 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात सुमारे 1,39,700 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शाळा सुरू करणं महागात पडू शकतं, असं चित्र आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतची शाळा मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, तर इयत्ता 10 वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत.

मध्य प्रदेश राज्यात कोरोना विषाणू फैलावामुळे 30 मार्च 2021 पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असे सरकारने जाहीर केलं आहे. मात्र, दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत. त्यामुळे त्यांचे नियमित वर्ग आता होणार आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले आहेत, तर 10 वी, 12 वीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत, असेही सांगितलं आहे.

शाळा सुरू केल्यानंतर कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. 4 पैकी 3 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे, असे आढळले आहे.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने कोरोनाबाबात दिलेल्या एका रिपोर्टमधून हा खुलासा केलाय. रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली असून भीतीचे वातावरण निर्माण झालंय.
एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, सर्व पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 40 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5 टक्के रुग्ण 12 वर्षांखालील आहे. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग होतो. मात्र, लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही? हे शोधणे कठीण होत आहे.

गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार देशातील जवळपास 10 राज्यांत शाळा सुरू झाल्यात. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.