Schools Internet Facilities | केंद्राच्या यूडायस प्लसची धक्कादायक माहिती; राज्यातील 36 टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Schools Internet Facilities | अलीकडच्या काही दिवसांमध्ये सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना (Corona) काळात तर सर्वच शाळांनी ऑनलाइन प्रणाली (Online System) सुरू केली. तर राज्य सरकारनेही (State Government) डिजिटल शाळा (Digital School) ही संकल्पना अंमलात आणली. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (State School Education Department) एकविसावे शतक, प्रगत महाराष्ट्र, तंत्रस्नेही शिक्षक अशा मोठ्या घोषणा केल्या मात्र या घोषणा हवेतच विरल्या असल्याचे समोर आले आहे. केंद्राकडून मिळालेल्या यूडायस प्लसच्या UDISE+ (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सीस्टम फॉर एज्युकेशन) माहितीवरून राज्यात केवळ 36 टक्के शाळांमध्येच इंटरनेट सुविधा (Schools Internet Facilities) असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रगत आणि डिजिटल महाराष्ट्र (Digital Maharashtra) कसा होणार हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

 

देशात असणाऱ्या शाळांच्या विविध सोईसुविधा, प्रवेशाची माहिती देणारा यूडायस प्लस माहिती अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Union Ministry of Education) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यात सर्व व्यवस्थापनाच्या मिळून एकूण 1 लाख 10 हजार 114 शाळा आहेत. त्यापैकी केवळ 36 टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा असल्याचे समोर आले आहे.

शासकीय शाळांचा विचार केला तर 11 टक्के शासकीय शाळांत (Government Schools) ही सुविधा आहे. याउलट छत्तीसगड (Chhattisgarh), केरळ (Kerala), पुद्दुचेरी (Puducherry), पंजाब (Punjab) या राज्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 90 टक्केपेक्षा जास्त इंटरनेट सुविधांचे (Schools Internet Facilities) प्रमाण आहे. दुसरीकडे इंटरनेट सुविधांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh), आसाम (Assam), बिहार (Bihar), मेघालय (Meghalaya), मिझोराम (Mizoram), ओडिसा (Odisha), नागालँड (Nagaland), त्रिपुरा (Tripura) यांचा समावेश होतो.

 

अलीकडे इंटरनेट सुविधा ही काळाची गरज बनली आहे.
या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना निश्चितच विविध तंत्रज्ञान हाताळणे सोपे जाते. शिवाय ऑनलाइन अभ्यासाचाही सराव होतो.
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाली. त्यानंतर आता शाळा सुरू झाल्या आहेत.
मात्र 50 टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये इंटरनेटचा अभाव असताना, शाळा व्यवस्थापन याचे नियोजन कसे करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Web Title :- Schools Internet Facilities | internet facilities in only 36 percent of schools in the maharashtra state

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा