Schools Open in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरु होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Schools Open in Maharashtra | मागील दोन वर्षापासून जगावर कोरोनाचे (Corona) सावट निर्माण झालेय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच शाळांना टाळं लागलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शासनाने उपलब्ध करुन दिला. कोरोनाचे सावट ओसरल्याने हळूहळू निर्बंध शिथिल झाले. अशातच महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यास परवानगी (Schools Open in Maharashtra) दिली गेली. दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरु करण्यास ठाकरे सरकारने (Thackeray Government) परवानगी दिली आहे.

 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून (Department of School Education) एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करण्याबाबत परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. तर, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षामध्ये मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता 1 ली ते 9 वी आणि इयत्ता 11 वीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात याबाबतचेआदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिले आहेत. तसेच, एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असे देखील परिपत्रकात म्हटलं आहे. (Schools Open in Maharashtra)

दरम्यान, रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगी देखील दिली गेली आहे.
त्याचबरोबर, इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वीच्या परीक्षा कधी घेण्यात याव्यात या संबंधीच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत.
या परिक्षा एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावे असं देखील सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Schools Open in Maharashtra | school education department gave permission to open schools with 100 percent attendance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu Viral Video | आजपर्यंत समंथाची ही बाजू कोणालाच नव्हती ठावूक, अखेर व्हिडिओमुळे झाला खुलासा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

7th Pay Commission | मोदी सरकारने दिले फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे अपडेट ! इतकी वाढू शकते सरकारी कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी