‘चंद्रयान – 2’चा संपर्क तुटला तेव्हा पाकिस्तानी मंत्र्याने केली ‘नापाक’ टीका

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – चांद्रयान-2 साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-2” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, चांद्रयान अवघे 2.1 कि.मी. वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला. यावर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी एक खिल्ली उडवताना ट्विट केले आहे. हे मिशन काही काळ थांबल्यामुळे (एंड झाल्यामुळे) त्याने उपहासात्मक भाषेत इंडियाचा एंडिया म्हणून उल्लेख केला आहे.

फवाद हुसेन यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की , ‘ जे काम येत नाही त्याच्याशी पंगा घेत जाऊ नका. .. डियर “एंडिया”.

भारताच्या कोणत्याही मुद्द्यात नाक खुपसण्याची चौधरी फवाद हुसेन यांची जुनी सवय आहे. यापूर्वीही त्यांनी अशी अनेक भारतविरोधी ट्विट केली आहेत. जम्मू्-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर काश्मीरविषयी बोलताना चौधरी फवाद हुसेन म्हणाले होते की , ‘पाकिस्तानी खासदारांनी संसदेत निरुपयोगी विषयांवर आपसात भांडण्याऐवजी भारताला सडेतोड उत्तर द्यावे भारताशी युद्ध करण्यासाठी आपल्याला सज्ज राहण्याची गरज आहे. ‘

राहुल गांधींवरही निशाणा – दिला होता नेहरूंकडून शिकण्याचा सल्ला
काश्मीरच्या मुद्द्यात पाकिस्तानला हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. या राहुल गांधींच्या विधानाने ते चांगलेच बिथरले होते त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, राहुल आपल्या राजकारणाबद्दल खूप गोंधळलेले आहेत आणि त्यांचे आजोबा जवाहरलाल नेहरूंकडून शिकण्याची गरज आहे.’

You might also like