सूर्य आणि चंद्रग्रहणातील फरक समजत नाही PAK च्या विज्ञान मंत्र्याला, ट्विटरवरील ‘या’ चुकीमुळे उडवली जातेय खिल्ली

नवी दिल्ली : वृत्त संस्था –पाकिस्तानचे सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी मिनिस्टर चौधरी फवाद हुसैन नेहमी भारतविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात राहतात. मात्र, ते अनेकदा सोशल मीडियावर अशा चुका करतात की त्यांना अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले जाते. फवाद हुसैन यांनी नुकतेच एक असे ट्विट केले होते, ज्यावरून सोशल मीडियावर त्यांची भरपूर खिल्ली उडवली गेली. फवाद यांनी आपल्या ट्विटमध्ये 21 जूनला सूर्यग्रहणाबाबत जे काही लिहिले, त्यावरून असे दिसून येते की, त्यांना सूर्य आणि चंद्रग्रहण यातील फरक समजत नाही.

सूर्य ग्रहणाला म्हणाले चंद्रग्रहण
चौधरी फवाद हुसैन यांच्यावर पाकिस्तानच्या सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी मंत्रालयाची जबाबदारी आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी फवादवर देशाला वैज्ञानिक दिशेने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवली आहे. परंतु, 21 जूनरोजीच्या सूर्यग्रहणाबाबत त्यांनी जे ट्विट केले त्याने फवाद हुसैन यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केले आहे. फवाद हुसैन यांनी ट्विटरवर या खगोलीय घटनेचा उल्लेख सूर्यग्रहण ऐवजी चंद्रग्रहण असा केला, यानंतर ते सोशल मीडियावर खुप ट्रोल झाले.

21 जूनच्या सूर्यग्रहणाच्या तीन दिवस अगोदर पाकिस्तानमध्ये विज्ञान आणि औद्योगिक मंत्री मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी ट्विटरवर लिहिले की, चंद्रग्रहणावर काही आणखी माहिती. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी ग्रहणाबाबत माहिती देणारे ज्या पेपर्सचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले त्यामध्ये सूर्य ग्रहण आणि त्यासंदर्भातील उल्लेख आहे. फवाद यांच्या या पोस्टनंतर ताबडतोब सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले गेले. यूजर्सने ग्रहणाबाबत चुकीची माहिती दिल्याने त्यांची जोरदार खिल्ली उडवली.

पाकिस्तानने सुद्धा पाहिली ’रिंग ऑफ फायर’
काही यूजरने चौधरी फवाद हुसैन यांची चूक दाखवून देत त्यांना सांगितले की, हे सूर्यग्रहण नसून चंद्रगहण आहे. तर, काही लोकांनी मंत्र्याला हे ट्विट काढून टाकण्यास सांगितले. तर काहींना मीम्सद्वारे त्यांची भरपूर थट्टा केली. 21 जूनला पाकिस्तानने सुद्धा रिंग ऑफ फायर सूर्यग्रहण पाहिले. पाकिस्तानच्या हवामान विभागानुसार, आंशिक ग्रहण सकाळी 8.45 ला सुरू झाले आणि दुपारी 2.34 ला समाप्त झाले. पाकिस्तानमध्ये रिंग ऑफ फायर सकाळी 11.40 वाजता पूर्ण दिसले.