काय सांगता ! होय, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये TV, फ्रिज, AC, वॉशिंग मशीनवर तब्बल 75 % सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेल, सेल, सेल,… ‘फ्लिपकार्ट’वर सेल सुरु झाला आहे. यात टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनसारख्यावर ७५ टक्के इतकी सूट दिली आहे. फ्लिपकार्टवर ९ ते १३ सप्टेंबरपर्यंत Grand Home Appliances Sale चे आयोजन केले आहे.

जर तुम्हाला टिव्ही, एअर कंडिशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा दुसरे किचन अप्लायन्सेज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ची खास संधी आहे. फ्लिपकार्टवर ९ ते १३ सप्टेंबरपर्यंत सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये होम अप्लायन्सेजवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जातेय. तसेच अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन वर १० टक्के डिस्काउंट मिळत आहे.

फ्लिपकार्टवरील या सेलमध्ये सॅमसंग, व्हीयू, आणि अन्य दुसऱ्या ब्रँड्सचे नवीन स्मार्ट अँड्रॉयड टीव्ही १२ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येत आहे. बेस्ट टीव्ही डिल्स अंतर्गत ८ हार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत टीव्ही घेता येईल.

टॉप सेलिंग एलजी एलईडी टीव्हीला १४ हजार ९९९ रुपये आणि टॉप सेलिंग 4 के QLED स्मार्ट टीव्हीला १३ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येते. मी अँड्रॉयड टीव्हीची सुरुवातीची किंमत १२ हजार ४९९ रुपये इतकी आहे.

याशिवाय, ६ हजार १९६ रुपयांच्या किंमतीसह फ्रिज खरेदी करण्याची हि एक संधी आहे. सिंगल डोर रेफ्रिजरेटर्सल ६ हजार ४९० रुपयांत तसेच फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स १६ हजार २९० रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येईल.

विंडो एसी २० हजार ९९९ रुपये तर मार्क्यू, कॅरियर, एलजी आणि अन्य दुसऱ्या ब्रँडच्या इनवर्टर एसीला २० हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये खरेदी येणार आहे.