नवरात्रीमागे दडलेली वैज्ञानिक कारणे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देवी भागवत पुराणानुसार, वर्षभरात चार नवरात्र साजरे केले जातात, ज्यात दोन गुप्त नवरात्री सोबतच शारदीय नवरात्र आणि बासंती नवरात्र असे दोन नवरात्र असतात, ज्यांना चैत्र नवरात्र असे म्हणतात. वास्तविक, हे चारही नवरात्र ऋतू चक्रावर आधारित आहेत. शरदिया नवरात्री वैभव आणि आनंद देणारी असते . गुप्त नवरात्री तंत्र सिद्धिसाठी खास आहे तर चैत्र नवरात्र स्वत: ची शुध्दीकरण आणि मुक्तिसाठी आहे. तसे, सर्व नवरात्रांचे स्वतःचे आध्यात्मिक महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता, निसर्ग आणि मनुष्याच्या संयोजनाची ही वेळ असते. निसर्ग ही मातृशक्ती आहे, म्हणून या काळात देवीची पूजा केली जाते.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या नवरात्रात सूर्याची राशी बदलते. सूर्य १२ राशींचा प्रवास पूर्ण करतो आणि त्यानंतर पुढील चक्र पूर्ण करण्यासाठी प्रथम राशीत प्रवेश करतो. धार्मिक दृष्टीने नवरात्रीला फार महत्त्व आहे. कारण या वेळी, आदिशक्ती, ज्यांनी या संपूर्ण सृष्टीला आपल्या भ्रमात व्यापून टाकले आहे, ज्याची शक्ती निर्मितीवर शासन करीत आहे, जी आनंद आणि मोक्ष देणारी देवी आहे, अशी हि माता या दिवसात पृथ्वीवर येते. म्हणूनच या मातेची पूजा आणि उपासना केल्यास इच्छित फळ इतर दिवसांपेक्षा लवकर प्राप्त होते.

नवरात्रीचे महत्त्व केवळ धर्म, अध्यात्म आणि ज्योतिषाच्या दृष्टीनेच नाही तर वैज्ञानिक दृष्टीनेही नवरात्रांचे महत्त्व आहे. जेव्हा ऋतू बदलाची वेळ येते तेव्हा अनेक रोगांची निर्मिती होते. अशा रोगांचा नाश करण्यासाठी हवन केले जाते, ज्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. आपल्या ऋषीमुनींनी नवरात्राला धार्मिक दृष्टी ठेवून व्रत आणि हवन करण्याचे सांगितले नाही तर त्याचा वैज्ञानिक आधारही आहे. नवरात्रात उपवास व उपासना करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते . याचे कारण म्हणजे नवरात्रीच्या वेळी ऋतुमानात बदल होते. ज्यमुळे शारीरिक आणि मानसिक बळ कमी होते. अशा वेळी शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी तसेच शरीर ऋतुमानाप्रमाणे ठेवण्यासाठी उपवास केला जातो.