शास्त्रज्ञांनी शोधली पुढील ‘महामारी’, ‘या’ देशातून आणि जीवातून पसरण्याची शक्यता !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीने जगभरात भीतीचे वातावरण आहे. आता तर शास्त्रज्ञांनी पुढील महामारी कोणती असेल याचा शोध लावला आहे. सोबतच हे सुद्धा शोधले आहे की, ही महामारी कोणत्या देशातून, कोणत्या जीवातून पसरण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी हे सुद्धा सांगितले की, कशाप्रकारे पुढील महामारी टाळता येऊ शकते. यावेळी महामारी ब्राझीलच्या अमेझॉन जंगल, तेथील वटवाघूळ, माकडे आणि उंदरांच्या प्रजातीमध्ये असलेल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसने पसरू शकते. शास्त्रज्ञांनी आपल्या रिसर्चमध्ये काय शोधले जाणून घेवूयात?

ब्राझीलच्या मानोस येथील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ अमेझॉनासचे बायोलॉजिस्ट मार्सेलो गोर्डो आणि त्यांच्या टीमला अलिकडेच कुलरमध्ये तीन पाईड टॅमेरिन माकडांचा सडलेला मृतदेह सापडला. कुणीतरी या कुलरचा वीज पुरवठा बंद केला होता. ज्यानंतर माकडांचे मृतदेह आतच सडले. मार्सेलो आणि त्यांच्या टीमने या माकडांचे सॅम्पल घेतले आणि ते फियोक्रूज अमेझोनिया बायोबँकमध्ये घेऊन गेले. येथे त्यांना शास्त्रज्ञ अलेसांड्रा यांनी मदत केली. त्यांनी माकडांच्या सॅम्पलमधून पॅरासिटिक वॉर्म्स, व्हायरस आणि अन्य संसर्गजन्य एजंट्सचा शोध घेतला.

अलेसांड्रा यांनी सांगितले की, ज्याप्रकारे मनुष्य जंगलांवर ताबा करत आहे, अशावेळी तिथे राहणार्‍या जीवांमध्ये असणारे व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅथोजेन्स मनुष्यावर हल्ला करून संसर्ग पसरवत आहेत. अगदी असेच चीनमध्ये झाले. तिथून जे व्हायरस निघाले त्यांच्यामुळे मिडल ईस्ट सिंड्रोम पसरला. तिथूनच सार्स पसरला, आता तिथूनच कोरोना व्हायरस निघाला, ज्याने मागील सुमारे दोन वर्षापासून जगात विध्वंस माजवला आहे.

ब्राझीलच्या मानोसच्या चारही बाजूला अमेझॉन जंगल आहे. ते शेकडो किलामीटरमध्ये पसरलेले आहे. मानोसमध्ये 22 लाख लोक राहतात. जगभरातील 1400 वटवाघळांच्या प्रजातींपैकी 12 टक्के केवळ अमेझॉन जंगलात राहतात. याशिवाय माकडे आणि उंदरांच्या अनेक प्रजाती सुद्धा राहतात, ज्यांच्यावर व्हायरस, पॅथोजेन्स आणि बॅक्टेरिया किंवा पॅरासाइट राहतात. ते कधीही मनुष्यात येऊन मोठ्या महामारीचे रूप घेऊ शकतात. यामागे शहरीकरण, रस्ते बनवणे, डॅम बनवणे, खाणी बनवणे आणि जंगलतोड ही कारणे आहेत.

फियोक्रूज अमेझोनिया बायोबँकचे शास्त्रज्ञ अलेसांड्रा आणि त्यांच्या टीमचे लोक नेहमी हा शोध घेत असतात की, कोणत्या जंगली जीवातून कोणता पॅथोजेन मनुष्याच्या शरीरात सहज प्रवेश करून सामान्य आरोग्य संबंधी स्थिती बिघडवू शकतात. जनावरांमधून मनुष्यात येणार्‍या आजारांना जूनोसेस म्हणतात. मानोसमध्ये कोरोना व्हायरसच्या दोन मोठ्या आणि भयंकर लाटा आल्या आहेत. ज्यामुळे शहरात आतापर्यंत 9000 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या कोरोना व्हायरस व्हेरिएंट पी 1 ची उत्पत्ती मानोस शहरातूनच झाली होती. हा अतिशय धोकादायक कोरोना व्हायरस असून तो इम्यूनिटीला सुद्धा फसवू शकतो.

शहरी भागासाठी अमेझॉन जंगलातून निघालेली टॅमरिन माकडे, उत्तर अमेरिकेचा भाग आणि रकूनसाठी मोठा धोका आहे. माकडांमध्ये फाइलेरियाचे नीमेटोड्स सापडले आहेत. सोबतच झीका आणि चिकनगुनियाचे व्हायरस सुद्धा या माकडांमध्ये आहेत. ब्राझीलमध्ये झीका व्हायरस मनुष्यातून परत माकडांमध्ये गेला होता. परिणाम हा झाला की, अनेक गरोदर मादी माकडांचा गर्भपात करावा लागला होता. कारण मादी माकडांचे भ्रूण आणि शरीरात मनुष्यासारखी सर्व लक्षणे दिसत होती.

अलेसांड्रा यांनी म्हटले मानौसच्या टॅमरिन माकडांमध्ये सध्या असे व्हायरस नाहीत, परंतु ही माकडे कधीही मनुष्याला धोकादायक प्रकारे संक्रमित करू शकतात. मात्र, मच्छर झीका सारख्या व्हायरसने मनुष्याला संक्रमित करू शकतात. मानौसच्या जवळपास टॅमरिन माकडांची संख्या वेगाने कमी होत आहे. पुढील 16 वर्षात यांची संख्या 80 टक्के कमी होईल. जर कोणता व्हायरस सरला तर ते आणखी लवकर नष्ट होतील.