राज्यात पावसाचा ‘हाहाकार’, पण ‘इथं’ सुरू झालाय कृत्रिम पावसाचा ‘प्रयोग’ !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक नागरिक पुरात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद मधून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रज्ञांसह विमान आकाशात झेपावले आहे. गेल्या काही वर्षापासून मराठवाडा दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचे महसूल विभागाने जाहीर केले होते.

या अनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर रविवारी डॉपलर रडार बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. रडारची यंत्रणा कार्यान्वीत झाल्यानंतर शुक्रवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आगमन झाले आणि विमान पश्चिम दिशेला पाठवण्यात आले आहे.

विभागीय आयुक्‍तालयातील डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या कंट्रोलरूमकडून वैमानिकास आणि शास्त्रज्ञांना इमेजेस पाठविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी दीड वाजता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी विमानाने आकाशात झेप घेतली आणि आता हा प्रयोग सुरु झाला असून पहिल्या दिवशी ५० किमी अंतरावर असलेल्या ढगांवर ‘मेघ बीजारोपण ‘ करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like