दिलासादायक ! ‘कोरोना’ व्हायरसच्या उपचारावर वैज्ञानिकांना मिळालं महत्वपुर्ण यश, बनवलं नवं औषध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूएस युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन (UPMC) च्या शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूपासून बचाव आणि उपचारात ‘महत्त्वपूर्ण यश’ मिळालं आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की त्यांनी सर्वात लहान बायोलॉजिकल मॉलेक्युलला वेगळं केलं आहे जे कोरोना विषाणूला न्युट्रालाईज करतो.

शास्त्रज्ञांनी नव्याने सापडलेल्या मॉलेक्युल पासून Ab8 औषध तयार केले आहे. वास्तविक हे रेणू अँटीबॉडीचा भाग आहे. हे सामान्य आकाराच्या अँटीबॉडीपेक्षा 10 पट लहान आहे. या औषधाची तपासणी उंदरांवर केली गेली. हे औषध दिलेल्या उंदीरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 10 पट कमी आढळली.

हे रेणू मानवी पेशीशी संलग्न होत नाही, म्हणून नकारात्मक दुष्परिणाम होण्याचा धोका नाही. संशोधकांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या उपचारात Ab8 औषध महत्त्वपूर्ण ठरू शकते.

पिट्सबर्ग विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख आणि अभ्यासाचे सह-लेखक जॉन मेलर्स म्हणाले की, Ab8 केवळ कोरोनावर उपचार करण्यासाठी एक थेरपी म्हणून काम करणार नाही, तर कोरोनाचा संसर्ग होण्यापासून लोकांना संरक्षण देण्यात देखील हे प्रभावी ठरू शकते.

नवीन शोधानंतर वैज्ञानिकांना औषधाची मानवी चाचणी सुरू करावी लागेल. तथापि, विद्यापीठातील अनेक संशोधकांनी Ab8 औषधाचे मूल्यांकन केले आहे. आतापर्यंत, सर्व शास्त्रज्ञांनी त्यांच्या तपासणीत असे आढळले आहे की औषधामुळे विषाणू पेशींमध्ये प्रवेश करणे थांबवतात.