Coronavirus : ‘कोरोना’च्या रूग्णाला मृत्यूचा कितपत धोका हे ब्लड टेस्टमधून समजेल : वैज्ञानिकांचा दावा

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमितांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. ज्या वेगाने कोरोना संक्रमित वाढत आहेत, त्याच वेगाने कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा सुद्धा वाढत आहेत. कोरोनावरील वॅक्सीन अजूनही कुठल्याच देशाकडे उपलब्ध नाही. जगभरात इतर औषधांनी कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जगात कोरोनाबाबत विविध शोध लावले जात आहेत. नुकतेच एका शोधनातून समजले आहे की, कोरोना व्हायरसने पीडित व्यक्तीला मृत्यूचा धोका किती आहे, हे कोरोना संक्रमिताच्या ब्लड टेस्टद्वारे समजू शकते.

अमर उजालाच्या एका वृत्तानुसार अमेरिकेच्या जॉर्ज वाशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये पाच संशोधकांच्या टीमने हा शोध लावला आहे. टीमने पाच अशा बायोमार्कर अणुंचा शोध लावला आहे, ज्यांचा संबंध कोरोनाच्या रूग्णाचा मृत्यू आणि क्लिनिकल कंडीशनला खराब करण्याशी आहे. याद्वारे समजू शकते की, कोरोना संक्रमित व्यक्तीला मृत्यूचा धोका किती आहे.

हे संशोधन जर्नल फ्यूचर मेडिसिनने प्रकाशित केले आहे. या शोधासाठी 299 कोरोना संक्रमित रूग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. जे 12 मार्च ते 9 मे दरम्यान संक्रमित झाल्यानंतर जॉर्ज वाशिंग्टन हॉस्पीटलमध्ये आले होते. संशोधकांनी सांगितले की, 299 रूग्णांपैकी 200 रूग्णांमध्ये पाच बायोमार्कर अणु सापडले आहेत. यांचे नाव – सीआरपी, आयएल-6, फेरेटिन, एलडीएच आणि डी-डिमर आहे.

बायोमार्कर अणु शरीरात काय काम करतात
संशोधकांच्या टीमने सांगितले की, बायोमार्कर अणुंच्यामुळे कोरोना संक्रमित रूग्णांच्या शरीरात जळजळ, सूज आणि रक्तस्त्राव वाढतो. याच्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची पाळी येते. अशा स्थितीत कधी-कधी रूग्णाचा मृत्यू होतो.

हे आहे शोधाच्या पाठीमागील कारण
जार्ज वाशिंग्टन युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर आणि सह-संशोधक जॉन रीस यांनी सांगितले की, चीनमध्ये काही संशोधन झाले होते, ज्यामध्ये समजले होते की, कोरोना संक्रमित रूग्णांची स्थिती खराब झाल्याने बायोमार्कर अणु प्रभावित होतात. या शोधात जी गोष्ट समोर आली होती, ते तपासण्यासाठी अमेरिकेत सुद्धा संशोधन करण्यात आले. बायोमार्कर अणु हेच याचे कारण आहे का, याचा शोध आम्ही घेतला. रीस म्हणाले, कोरोना रूग्णांच्या उपचाराच्या दरम्यान हे समजत नाही की, त्याची प्रकृती का बिघडत चालली आहे आणि का सुधारत आहे.