Cancer Treatment : कॅन्सर बरा करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला ‘हा’ नवा उपाय ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पावर वाढवून कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्यापासून आपण स्वत:चा बचाव करून शकतो. लंडनच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात दावा केला आहे. इंग्लंडच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचं म्हणणं आहे की, प्रत्यके व्यक्तीच्या शरीरात एक किलर टी सेल असतो. हा एक प्रकारचा इम्युन सेल असतो. हा सेल शरीरात एका स्कॅनरचं काम करतो. म्हणूनच शरीराला निर्माण होणारा कोणताही धोका संपवण्याची क्षमता यात असते.

प्रयोगशाळेत टी सेलचा वापर केल्यानंतर असं लक्षात आलं की, हे सेल्स फुप्फुस, स्किन, छाती, हाडं आणि प्रॉस्टेट किडनी आणि मध्ये होत असलेल्या कॅन्सरवर परिणामकारक ठरतात.

कॅन्सरच्या आजारात टी सेल्स थेरपी एक नवीनच शोध आहे. या थेरपीत मॉडीफाय इम्युन सेल्स हे कॅन्सरच्या सेल्सला संपवतात. कॅन्सरच्या आजारात सगळ्यात जास्त या थेरपीचा वापर केला जातो. याचं नाव CAR-T आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळे सेल्स असतात.