‘कोरोना’ नं आत्तापर्यंत घेतला 1100 जणांचा जीव, आता समोर आला आणखी एक ‘रहस्यमय’ व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे आणि या विषाणूने आतापर्यंत ११०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान पहिल्यांदाच आणखी एक रहस्यमय विषाणू उघडकीस आला आहे. या विषाणूचे नाव Yaravirus आहे.

ब्राझीलमधील शास्त्रज्ञ तेव्हा आश्चर्यचकित झाले जेव्हा हा नवीन विषाणू पूर्वीच्या ज्ञात व्हायरससारखा दिसला नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की याराव्हायरस चे ९० टक्के जीन यापूर्वी पाहिले गेले नाहीत.

कोराना विषाणूचे नवीन नाव कोविड – १९ असे ठेवण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूचा शोध लागला होता. आतापर्यंत ४४ हजाराहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, जानेवारी २०२० मध्येच या विषाणूचे दस्तऐवजीकरण झाले होते. अचानक ब्राझीलमधील कृत्रिम तलावामध्ये वैज्ञानिकांना याराव्हायरस सापडला. या विषाणूमध्ये एकूण ७४ जीन आढळली.

ब्राझिलियन फेडरल युनिव्हर्सिटी मिनास गेराइस यांच्या म्हणण्यानुसार, सध्या या विषाणूचा धोका मानवांना नाही. हा विषाणू केवळ amoeba च्या दरम्यानच राहतो आणि आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मानवांना त्याचा संसर्ग होणार नाही.