अमेरिकेत येणार कोरोनाची चौथी लाट ?; ‘हे’ आहे त्यामागचं कारण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही अमेरिकेत आहे. त्यानंतर आता अमेरिकेत कोरोना व्हायरसची चौथी लाट येणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेला या संक्रमक लाटेपासून उष्णतेमुळे दिलासा मिळणार आहे. मात्र, आता जगातील नव्या व्हायरसची सुरुवात आहे? की जुन्या कोरोना व्हायरसचा अंत होणार आहे, हा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे.

‘द न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, की देशात कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधक नियमांमध्ये सूट दिली जात आहे. अमेरिकेतील बहुतांश लोक आताही कोरोना व्हायरसला कमकुवत मानत आहे. तसेच नियमांमध्ये दिलेल्या सवलतींमुळे संपूर्ण देशात कोरोना व्हायरसची चौथी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केले जात आहे.

अमेरिकेत फक्त दोन लशी
अमेरिकेत आत्तापर्यंत फक्त दोन लशींचे लसीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया वेगाने होत आहे. त्यामुळे आता आशा आहे, की लवकरच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणही अमेरिकेतील लोकांसाठी सुरु होईल. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेचा प्रभाव कमी होऊ शकतो. मात्र, त्याला येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन केल्यास त्यांना कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणार नाही
गेल्या वर्षीच्या कोरोनामुळे जसा अनेकांचा मृत्यू झाला होता. तसा कोरोना व्हायरसच्या कोणत्याही स्ट्रेनपासून लोकांचा मृत्यू होणार नाही. कारण तोपर्यंत जगभरातील कोट्यवधी लोकांना कोरोनावरील लस दिली गेली असेल. मात्र, जर अमेरिकेतील लोकांनी त्यांच्या सुरक्षेवर लक्ष दिले नाही तर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा त्यांना सामना करावा लागणार आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.