सांधेदुखीच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी शोधलं नवीन तंत्र !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सांधेदुखीच्या औषधांमधील सल्फापायरीडाइनचे (Sulfapyridine) दुष्परिणाम कमी करण्यासाठी रुग्णांना औषध देण्याची नवीन पद्धत भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (Lovely Professional University- LPU) मधील तज्ज्ञांच्या मते सल्फापायरीडाईन हे आर्थरायटिसचे (Arthritis) तिसरे सगळ्यात जुने औषध आहे. आतापर्यंत हे औषध वापरलं जात आहे. परंतु या गोळ्यांचं दीर्घकाळ सेवन केल्यानंतर चक्कर येणं, उलट्या होणं, पोटदुखी अशा अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. आता डॉक्टरांनी नवीन तंत्र विकसित केलं आहे जे थेट अवयवात औषध पोहोचवण्याचं काम करतं.

एका हिंदी वृत्तानुसार, एलपीयुमधील स्कुल ऑफ फार्मास्युटीकल सायंसेजचे प्राध्यापक भूपिंदर कपूर (Bhupinder Kapoor) यांनी सांगितलं की, आम्ही ही पद्धत विकसित केली आहे. यामुळं शरीरातील त्रास असलेल्या भागापर्यंत औषध पोहोचवता येऊ शकतं. याशिवाय या पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. ही एक सुरक्षित पद्धत आहे. मॅटेरियल्स सायंस अँड इंजिनियरींग सी या पत्रकात याबाबत शोध प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी सल्फापायरीडाईन एक नवी प्रोड्रग विकसित करण्यासाठी तसंच औषधांमध्ये सहभागी करून घेण्याची माहिती दिली आहे.

प्रोड्रग (Prodrug) सर्वात आधी प्रभावित अवयवांमध्ये थेट इंजेक्ट केलं जाणार आहे. या प्रकारात औषधाच्या रुपात सेवन केलं जात नाही. संशोधकांनी सांगितलं की, यामुळं औषध संपूर्ण शरीरात न पसरता प्रभावित भागापर्यंत जाऊन आपलं काम सुरू करतं. संशोधकांनी हे औषध देण्यासाठी प्री क्लिनीकल ट्रायल पूर्ण केलं होतं. या अभ्यासाचं विश्लेषण लुधियाना आणि तमिळनाडूमधील ऊटीमधील जेएसएस कॉलेज ऑफ फॉर्मेसीच्या विद्यार्थ्यांसह मिळून केलं होतं.

यामुळं संधीवात होतो

तुम्हाला पायांची बोटं, गुडघे आणि टाचांमध्ये वेदना होत असतील तर समजा की, तुमच्या रक्तात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं आहे. हे हात आणि पायांच्या जॉईंटमध्ये क्रिस्टलच्या रुपात गोठतं आणि यामुळं संधीवात होतो.

किती प्रकारचा असतो संधीवात ?

संधीवात हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. परंतु सर्वात कॉमन आहे ऑस्टियो आर्थरायटीस आणि रुमॅटायड आर्थरायटीस. त्याच्यासोबत इंफेक्शन आणि मेटाबॉलिजम आर्थरायटीसच्या केसेसही अधिक पाहण्यात आल्या आहेत.

ऑस्टियाो-आर्थरायटीस (Osteoarthritis)

हा वाढत्या वयासोबत सामान्यपणे 50 वयानंतर जास्त त्रास देतो. परंतु आता बदलत्या लाईफस्टाईलमुळं तरुणांमध्येही ही समस्या बघायला मिळत आहे. यात सामान्यपणे गुडघ्यांवर प्रभाव पडतो. सोबतचं बोटं आणि कमरेतही समस्या होते. परंतु भारतात जास्त गुडघ्याची समस्या पहायला मिळते.

रुमॅटायड आर्थरायटीस (Rheumatoid Arthritis)

हा एक ऑटोइम्युनिटी असलेला आजार आहे. यात शरीर आपल्याच विरोधात काम करू लागतं. घरात आधी कुणाला हा आजार असेल तर इतरांना होण्याची शक्यता अधिक असते. यात हाताचे कोपरे, बोटं, खांदे, पायांचे जॉईंट्स यात वेदना होतात. नेहमी वेदना शरीराच्या दोन्ही बाजूनं म्हणजे दोन्ही पाय, मनगटांमध्ये होते. यात हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते.

लक्षणं –

– जॉईंट्समध्ये सूज, असहनीय वेदना, जॉईंट्समधून आवाज येणं, बोटांमध्ये वेदना होणं.

या आजाराची कारणं

– ऑस्टियो आर्थरायटिस हा आजार वाढत्या वयामुळं जॉईंट्समध्ये होणाऱ्या कमजोरीमुळं होतो.
– तुमचं वजन फार जास्त असेल तर वयानुसार गुडघ्यांवर परिणाम होतो.
– शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यानं ऑस्टियो आर्थरायटिसचं कारण ठरतं.
– त्यासोबत एखाद्या जागेवर पुन्हा जखम झाल्यास, टीबीचं इंफेक्शन झाल्यास किंवा हार्मोन बदल झाल्यास हा आजार होण्याची शक्यता असते.

कसा करावा बचाव ?

1) नियमित व्यायाम – नियमितपणे कार्डियो, स्ट्रेथनिंग आणि स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा. आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस 45 ते 50 मिनिटे एक्सरसाईज करा. कार्डियोसाठी जॉगिंग, ब्रिस्क वॉक, स्विमिंग आणि सायक्लिंग करू शकता. ब्रिस्क वॉक, प्रत्येक वयाच्या व्यक्तींसाठी सोपा आणि फायदेशीर आहे. काही एक्सपर्टचं म्हणणं आहे की, ट्रेडमिलऐवजी पार्कमध्ये जॉगिंग कराणं चांगलं आहे.

2) लाईफस्टाईल अ‍ॅक्टीव्ह ठेवा – फिजिकली तुम्ही जितके जास्त अ‍ॅक्टीव्ह असाल तितका आर्थरायटीस होण्याचा धोका कमी असतो. छोटी छोटी कामे आळस न करता स्वत: करा. जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसू नका. कोणत्याही भागावर दबाव टाकू नका. ऑफिसमध्ये कामातून जर 30 मिनिटांनंतर 5 मिनिटांचा ब्रेक घ्या.

3) बॅलन्स डाएट – आहारात प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त असावेत. त्यात पनीर, दूध, दही ब्रोकोली , पालक, राजमा, शेंगदाणे, बदाम यांचा समावेश आहे. हिरव्या भाज्या आणि फळंही खावीत. दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावं.

4) स्मोकिंग आणि ड्रिकिंग बंद करा – धूम्रपान फुप्फुसांसाठी, हृदयासाठी आणि हाडांसाठी नुकसानकारक असतं. स्मोकिंग सोडल्यानं आर्थरायटीसच्य रुग्णांना वेदना कमी होतात आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते. जास्त मद्यसेवन केल्यानं हाडांचं नुकसान होतं त्यामुळं आजचं या सवयी बंद करा.