Coronavirus : ‘कोरोना’शी लढणार्‍या अँटीबॉडीची ओळख पटली, व्हायरसला रोखण्यासाठी होईल मदत

बर्लिन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अनेक देश वॅक्सीन तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. कोरोना वॅक्सीनदरम्यान आता शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसशी लढण्यात उपयोगी एका अँटीबॉडीची ओळख पटवली आहे. शास्त्रज्ञांनी शोधले आहे की, ही अँटीबॉडी विषाणूंना पेशींमध्ये प्रवेश करण्यास आणि प्रजनन करण्यापासून रोखू शकते.

जर्नल सेलमध्ये प्रकाशित एका शोधानुसार कोरोना व्हायरसवर रिसर्च करत असलेल्या जर्मन सेंटर फॉर न्यूरोडीजेनेरेटिव्ह अँड चॅरिटी युनिव्हर्सिटी मेडिसिन बर्लिनच्या शास्त्रज्ञांना एक मोठे यश मिळाले आहे. या शास्त्रज्ञांनी कोरोना संक्रमित रूग्णांच्या रक्तातून 600 वेगवेगळ्या प्रकारची अँटीबाडी घेतली आणि त्याची तपासणी केली. यानंतर शास्त्रज्ञांनी या अँटीबाडीद्वारे एक कृत्रिम अँटीबॉडी विकसित केली. न्यूट्रलायजिंग नावाच्या या कृत्रिम अँटीबॉडीचा कोरोना व्हायरसवर परिणाम दिसून आला.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, कृत्रिम अँटीबॉडी न्यूट्रलायजिंगच्या द्वारे आम्ही खुप मोठ्याप्रमाणात कोरोना नष्ट करण्यात यश मिळवले आहे, परंतु अजूनही यावर जास्त संशोधन करणे बाकी आहे. आम्हाला शोधात आढळले की, ही अँटीबॉडी विषाणूंना पेशींमध्ये प्रवेश करणे आणि प्रजनन करण्यास रोखते.