भारत-चीन मध्ये जवळीक, पाकिस्तानने घेतला रशियाचा ‘अडोसा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असे म्हणले जाते की ज्या गोष्टी बोलून, वाचून देखील लक्षात येत नाही त्या गोष्टी एक फोटो सांगून जातो. असाच प्रकार बिश्केकमध्ये सुरु असलेल्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनाइजेशन या समिटमध्ये घडला आणि त्या बाबतचे फोटो समोर आले. त्यातून भारताच्या राजकीय धोरणांचा परिणाम जगातील साऱ्या देशांना पाहायला मिळाला.

भारतात प्रचंड मतांनी विजय झालेल्या नरेंद्र मोदींची अनेकांनी गळाभेट घेतली मात्र इमरान खान यात एकटे पडले. फोटोच्या काढण्याच्या वेळी इमरान खान राशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सोबत चर्चा करताना दिसले तर एकीकडे मोेदी आणि नेहमी पाकिस्तानला सहाय्य करणारे जिनपिंग हे एकत्र चर्चा करताना दिसले. आता या फोटोवरुन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावार राजकीय धोरण आणि नीतीवरुन चर्चा रंगू लागल्या आहेत.

फोटो काढण्यासाठी मंचावर एकत्र मात्र –
झाले असे की SCO समिटच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या देशाचे सदस्य फोटो काढण्यासाठी एकाच मंचावर जमले होते. पंतप्रधान मोदी फोटोच्या रांगेत सर्वात सुरुवातीला उभे होते. तर त्यांच्या एक दुसऱ्या सदस्या आड चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग उभे होते. त्या दोघांनी मंचावर जाताना एकमेकांसोबत चर्चा देखील केली. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये इतर देशांचे 4 सदस्य उभे होते.

इमरान खान यांची व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा –
फोटो काढताना इमरान खान, व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करताना दिसले. तर यावेळी मोदींनी SCO बैठकीत दहशतवादी कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आणि त्यासंबंधित नवा अंजेडा इतर देशाच्या सदस्यासमोर मांडला.

भारताने केली चीन, रशियांशी चर्चा –
या फोटो सेशन आधी पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग आणि रशियांचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. चीन कायम पाकिस्तानची बाजू घेत असल्याने भारताने त्यांच्या समोरच दहशतवादाचा मुद्दा मांडला आणि पटवून दिले की पाकिस्तान सोबत चर्चा करण्यासारखी परिस्थिती सध्या नाही. चीन बरोबर कूटनीति यासाठी आवश्यक आहे कारण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना चीनचे एक्सपर्ट मानले जाते.

सिने जगत – 

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

You might also like