भारतात लवकरच लाँच होणार  ‘ही’ महागडी स्कूटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्कोमादी ही ब्रिटीश कंपनी लवकरच भारतात पाऊल ठेवणार आहे. ही कंपनी TL200, TL200i, TL50, TL125 आणि TT125 या स्कूटींचं उत्पादन करत आहे. स्कोमादी भारतात आपले पहिले उत्पादन TT125  स्कूटर लाँच करणार आहे. कंपनीने ही जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचं म्हटलं आहे. या स्कूटीची किंमत २ लाख रुपये आहे. कंपनीने पुण्यामधील AJ डिस्टीब्यूटर्ससोबत करार केला असून त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. मे २०१९ मध्ये ही स्कूटर लाँच करण्याची शक्यता आहे.

ही स्कूटर स्टमायझेशन कलर्स आणि पेंट स्कीमच्या वाईड रेंजमध्ये दिसणार आहे. या स्कूटरचे १२५ सीसीचे इंजिन आहे. हे इंजिन इटलीवरून मागवण्यात येणार आहे. व थायलंडमध्ये बनवण्यात येणार आहे. हे इंजिन ७३०० आपीएम वर ११ बीएचपी पॉवर जनरेट करण्यात यशस्वी ठरणार आहे. ही स्कूटर्स थायलंडवरून आयात करणार आहे.

अशी आहे TT125 –

वर्षाभरापूर्वी येणाऱ्या लेम्ब्रेटा स्कूटी सारखे स्कूटीचे डिझाईन आहे. मॉडर्न लूकसह एलईडी हेडलाईट आणि टेललाईट स्कूटीला देण्यात आले आहेत. डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यामध्ये १२ इंचाची अ‍ॅलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. १०० किलो वजनाच्या या स्कूटीमध्ये ११ लिटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. TT125 मध्ये अप्रिलियाचं 125cc चं इंजन असणार आहे.