चंद्रपूर-मूल मार्गावर भरधाव स्कार्पिओची ट्रकला धडक, 6 जागीच ठार तर 6 जखमी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर – मूल मार्गावरील केसला घाट ते नागाळा दरम्यान भरधाव स्कार्पिओने थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, तीन महिला व एका २ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. संभाजी भोयर (वय ७७), कुसुम भोयर (वय ६५), जियान भोयर (वय २ वर्ष),दत्तू झोडे (वय ५०), मीनाक्षी झोडे (वय ३३), शशिकला वांढरे (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील बाबु पेठ परिसरातील भोयर व पाटील कुटुंबीय देशदर्शनासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे स्कार्पिओने गेले होते. ही मंडळी बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता परत येत होते. चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट ते नागाळा दरम्यान एक नादुरुस्त ट्रक रस्त्यावर उभा होता. वेगाने आलेल्या स्कार्पिओ चालकला रस्त्यातील हा ट्रक दिसला नाही. त्याने वेगाने ट्रकला मागून धडक दिली.

अपघाताची घटना समजताच ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्वांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्यातील ६ जणांचा मृत्यु झाला होता. गंभीर जखमी झालेल्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

You might also like