Coronavirus : काय सांगता ! होय, स्कॉटलंडचा क्रिकेटपटू देखील ‘कोरोना’ग्रस्त

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाची महामारी वेगाने पसरत असून जगभरातील राजकारणी, सेलिब्रेटीसह नागरिकांना बाधा झाली आहे. त्यानंतर आता स्कॉटलंडचा क्रिकेटपटू माजिद हकला यालाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 37 वर्षीय हकने ट्विटर हँडलवरुन माहिती दिली. 2006 ते 2015 या काळात माजिदने 54 वन-डे आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये स्कॉटलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या ग्लास्गोच्या रॉयल अ‍ॅलेक्झांड्रा हॉस्पीटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

स्कॉटलंडमध्ये आतापर्यंत 322 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 2015 विश्वचषकात माजिदने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. कोरोना व्हायरसने माजिदची तब्येत सध्या स्थिर आहे. तरीही त्याला पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. माजिद सध्या स्कॉटलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो.