बोर्डाच्या निकालाविरोधातील आंदोलनासाठी आलेल्या काँग्रेस नेत्यांमध्येच हाणामारी

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणा बारावी बोर्डाच्या निकालावरून काँग्रेसकडून राज्यसरकार विरोधात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलन बाजूलाच राहिले पण काँग्रेसच्या नेत्यांमध्येच झटपट झाली. ही हाणामारी नक्की कोणत्या मुद्द्यावरून झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एका मुद्द्यावरून झालेल्या मतभेदांचे रुपांतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते हनुमंथा राव आणि नागेश मुदिराज यांच्या हाणामारीत झाले. याबाबतचे ट्विट एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

नक्की काय आहे प्रकरण ?

तेलंगणा बोर्डाचे निकाल १८ एप्रिलला लागले होते. यानंतर बोर्डावर अफरातफरी केल्याचे आरोप झाले. त्यामुळे पालकांनीही मोठ्या प्रमाणावर नाराजी जाहीर केली होती. निकाल जाहीर झाल्यापासून राज्य सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. विरोधी पक्षांनी हाच मुद्दा उचलून धरीत या आंदोलनात उडी घेतली. पण आंदोलनात सहभागी झालेल्या कोंग्रेस नेत्यांमध्येच जुंपली. या नेत्यांनी थेट एकमेकांची कॉलरचा पकडली.

टीबीआयआय बोर्डाविरोधात निकालांमध्ये अफरातफर केल्याचा आरोप लावला आहे. या काळात राज्य सरकारने नापास झालेल्या तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्याचे आदेश दिले आहेत. यंदाच्या परिक्षेला ९. ७४ लाख विद्यार्थी बसले होते. यापेकी ३. २८ लाख विद्यार्थी नापास झाले आहेत. पहिल्या वर्षी ५९.५ आणि दुसऱ्या वर्षात ६५ टक्के विद्यार्थी पास झाले होते.