प्रसिध्द मूर्तिकार शशिकांत बागवे यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लालबाग येथील प्रसिद्ध मूर्तिकार व बागवे आर्टसचे शशिकांत बागवे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मूर्तिकलेतील जिवंतपणा हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. मातीकाम आणि रंगकाम यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही, असे त्यांचे काम होते. आपुलकीच्या नात्याने त्यांनी मूर्तीशाळेत येणाऱ्या भाविकांना जपले. ७०-७५ वर्षांपासूनचं हे नातं त्यांनी शेवटपर्यंत जपलं.

वडिलांच्या हाताखाली मूर्तिकलेचे धडे
शशिकांत बागवे यांनी वडिलांच्या हाताखाली लहानपणापासून मूर्तिकलेचे धडे गिरवित “बागवे आर्टस्” ही संस्था नावरूपास आणली. मनोहर व सदानंद या दोन बंधूंना हाताशी धरून त्यांनी लहान तसेच मोठ्या मूर्ती घडविल्या. १९९० ते १९९६ दरम्यान लालबागचा राजा व २००३ ते २०१० या काळात त्यांनी गणेशगल्लीचा राजाची मूर्ती साकारली. याशिवाय डोंगरीचा राजा, नेरुळ व बेलापूरचा राजा, खेतवाडी ६ वी व १० वी गल्ली, मध्य भायखळा, घाटकोपर, भाईंदरच्या मंडळांसाठी अनेक गणेशमूर्ती त्यांनी घडविल्या. त्यांच्या मूर्तींपैकी २०१० मध्ये गणेशगल्लीच्या राजाला आणि २०१३ मध्ये डोंगरीच्या राजाला “मुंबईचा राजा” हा बहुमान मिळाला. . २०१६ मध्ये त्यांची ऑस्ट्रेलियाला गेलेली मूर्ती ही आतापर्यंत परदेशात गेलेल्या मूर्तींपैकी सर्वात उंच मूर्ती होती. याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

उत्कृष्ट मूर्तिकाराचा पुरस्कार
लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य प्रतिज्ञेला २०१६मध्ये १२५ वर्षे पूर्ण झाले होते. त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या स्पर्धेत मुंबई जिल्ह्यात उत्कृष्ट मूर्तिकाराचा प्रथम क्रमांकाचा सन्मान त्यांना मिळाला
आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा