मोबाईल, वाहन चोरांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरामध्ये मोबाईल आणि वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी गस्त घालत असताना सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.२१) रात्री साडेअकराच्या सुमारास अप्पर बस डेपोमध्ये करण्यात आली. त्यांच्याकडून १२ मोबाईल, एटीएम कार्ड, ५ दुचाकी असा एकूण २ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भर बाजारात त्याने महिलांशी केले असे काहीतरी…की महिलांनी दाखवला मर्दांनी इंगा…!

इम्तीयाज आयुब शेख (वय-२२ रा. साईबाबा नगर, कोंढवा बु), साकीर उर्फ मुला लाला सय्यद  (वय-१९ रा. संतोषनगर, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या एका अल्पवयीन साथिदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे कर्मचारी गस्त घालत असातना तीन संशयित अप्पर बस डेपोमध्ये बसले असल्याची माहिती पोलीस हवालदार चिप्पा यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार चिप्पा, पोलीस शिपाई पुजारी, मोरे, शिंदे, कुलकर्णी यांनी अप्पर बस डेपो येथे सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले.

परिस्थिती अशीच राहिल्यास निर्णय घेण्यास सक्षम : खडसे

आरोपींनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आणून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ मोबाईल, एटीएम कार्ड सापडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांच्याकडून मोबाईल आणि एटीएम कार्डची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनीकडून १२ मोबाईल आणि ५ दुचाकी जप्त करुन २ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पुर्व विभागाचे प्रभारी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ – ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक घावटे, पोलीस हवालदार चिप्पा, पोलीस शिपाई पुजारी, मोरे, शिंदे, कुलकर्णी यांच्या पथकाने केली.