कर्जदाराच्या राहत्या घराला फायनान्स कंपनीकडून सील, न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा फाटा येथील एका तरुणाने व्यवसायासाठी फायनांन्स कंपणीकडून कर्ज घेतलेले असतांना दृष्काळस्थिती असल्यामुळे चालू थकीत बाकी थकल्याने चक्क फायनांन्स कंपणीने या तरुणाच्या राहत्या घराला सिल ठोकल्यामुळे कर्जदार तरुणांच्या आई, भाऊ व बायको लेकर बेघर झाले असून त्यांचा संसार चावडीवर सुरु झाल्यामुळे त्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून साकडे घातले आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, नेवासा फाटा येथील निजाम अजिज शेख याने एस्पायर होम फायनांन्स कंपणीकडून सहा लाख ३३ हजार ३४१ रुपये कर्ज व्यावसायासाठी घेतलेले होते. त्यापैकी व्याजासह १ लाख १६ हजार ५९४ रुपये कर्ज चुकते केलेले होते. माञ या तरुणाचा अपघात झालेला आसल्याने फायनांन्स कंपणीची चालू थकीत बाकी १ लाख ५१ हजार १३४ रुपये थकल्याने फायनांन्स कंपणीकडून कर्जदाराला वेळोवेळी भ्रमनध्वनीव्दारे कर्ज भरण्यासाठी प्रसंगी दमबाजी करण्यात आलेली होती. कर्जदाराने माझा अपघात झालेला आहे ५० हजार रुपये बाकी भरतो असे सांगितले असता त्याला अर्वाच्च भाषेत फायनांन्स कंपणीकडून बोलून चक्क त्याच्या राहत्या घराला सिल ठोकल्यामुळे या तरुणाच्या आई, भाऊ व बायको लेकरासह सुमारे ११ जणांना बेघर होवून चावडीत राहण्याची वेळ या तरुणावर आली असून मी व्याजासह टप्यानुसार कर्ज भरण्यास तयार आहे पण मला घरायचा निवार हिसकावून घेतलेल्या कंपणीकडून घर खुले करुन देण्यासाठी या तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून न्याय द्यावा अन्यथा कुटूंबासहीत आत्महत्या करणार आसल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात दिला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

एकीकडे सरकार दृष्काळामुळे मदत करत असतांना फायनांन्स कंपण्या पैशांच्या तुंबड्या भरण्यासाठी ग्रामिण भागात कर्ज वाटप करुन पठाणी वसुली करत आसल्याने गोरगरीबांना बेघर होण्याची वेळ येत आसल्याचे दुर्देव आसल्याचे दिसून येत आहे.