जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे अभिनेता सीन कॉनेरी यांचं 90 व्या वर्षी निधन

वृत्तसंस्था –   जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे महान अभिनेते सीन कॉनेरी (Sean Connery) यांचं 90 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी 8 सिनेमांमध्ये बॉन्डची भूमिका साकारली होती. त्यांना आतापर्यंत ऑस्कर, बाफ्टा आणि 3 गोल्डन ग्लोबसह इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

जेम्स बॉन्ड यांची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय कोण याबाबत अलिकडील काळात एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये सीन कॉनेरी हे नंबर 1 वर होते. 44 टक्के मतदान सीन कॉनेरी यांना मिळालं होतं तर 32 टक्के मतदान हे टिम्थी डॉल्टन यांना मिळालं आणि ते दुसर्‍या क्रमांकावर राहिले. 23 टक्के मत घेऊन पीयर्स ब्रॉन्सन हे तिसर्‍या स्थानावर राहिले होते. सर सीन यांच्या इतर सिनेम्यांपैकी ‘द हंट फॉर रेड अक्टोबर’, ‘इंडियाना जोन्स एन्ड द लास्ट क्रूसेड’ आणि ‘द रॉक’ हे अधिक लोकप्रिय झाले होते.

You might also like