Sean Whitehead | दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ ऑल राऊंडरने अनिल कुंबळेला मागे टाकत एका इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sean Whitehead | टीम इंडियाचा महान क्रिकेटपटू अनिल कुंबेळनं (Anil Kumble) 1999 साली पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध दिल्लीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये (Test Match) एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला होता. यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) एका ऑल राऊंडरनं एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतल्या. त्याने फक्त 10 विकेट्स घेतल्या नाहीत तर मॅचमध्ये 111 रन देखील काढले आहेत. या दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचं नाव सीन व्हाईटहेड (Sean Whitehead) असे आहे. तो 2016 साली आफ्रिकेकडून अंडर 19 वर्ल्ड कप (Under-19 World Cup) खेळला आहे.

सीन व्हाईटहेडने (Sean Whitehead) 4 दिवसांच्या फ्रँचायझी मालिकेत साऊथ वेस्टर्नकडून (South Western) खेळताना इस्टर्नसविरुद्ध (South Eastern) ही ऐतिहासिक कामगिरी केली. इस्टर्नच्या टीमला हा सामना जिंकण्यासाठी 186 रनांची आवश्यक्ता होती. पण सीनने भेदक गोलंदाजी करत त्यांना सामना जिंकण्यापासून रोखले. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर एकट्यानंच इस्टर्नच्या टीमला ऑल आऊट केले.

 

या सामन्यात सीननं (Sean Whitehead) फक्त 36 रन देत 10 विकेट्स घेतल्या.
तसेच त्याने पहिल्या इनिंगमध्येही 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि 66 रन काढले होते.
हाच फॉर्म कायम ठेवत त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 45 रन काढले आणि सर्व 10 विकेट्स घेत टीमला 120 रननं मोठा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
सीननं या प्रकराची कामगिरी यापुढे देखील कायम ठेवली तर त्याची लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीममध्ये निवड होऊ शकते.

 

Web Title :- Sean Whitehead | south african spinner sean whitehead claims 10 wickets in an innings of first class match break record of indian cricketer anil kumble marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित ! महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न कोण करतंय? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Kranti Redkar | क्रांती रेडकरचा मंत्री नवाब मलिक यांच्यावर ‘घणाघात’, म्हणाल्या…

Former MLA Mohan Joshi | ‘खासदार बापट यांची आदळआपट कशासाठी? मेट्रोचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी’