धक्‍कादायक ! भारतातील ‘या’ शहरात 5000 पेक्षा जास्त स्पा सेंटर चालू, सर्च इंजनचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महिला आयोगाने सर्च इंजिनला नोटीस बजावली होती आणि त्यांच्या पोर्टलवर स्पा सेंटरच्या नोंदणीसंबंधित माहिती मागविली होती. आयोगाने दिल्लीतील अनेक स्पा केंद्रांची पाहणी केली होती आणि या केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला होता. या सर्च इंजिनवर स्पा आणि मसाज सेंटरच्या अनेक जाहिराती आणि वेबसाईट्स उपलब्ध असल्याची माहिती आयोगाला मिळाली.

राजधानीत अवैध स्पा आणि वेश्याव्यवसाय रॅकेट्स प्रकरणात आयोगाने तपास सुरू केला आहे. म्हणून आयोगाने त्यांच्या पोर्टलवर सूचीबद्ध असणाऱ्या सर्व स्पा सेंटरचा तपशील प्रसिद्ध सर्च इंजिनकडून मागविला होता यामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली.

तपशील मध्ये उघड?
दिल्ली महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात सर्च इंजिनने आयोगाला सांगितले आहे की दिल्ली राज्यात ५००० हून अधिक स्पा आणि मसाज सेंटर सूचीबद्ध(लिस्टेड) आहेत. राजधानीत ४९८ स्पा केंद्र सुरू असल्याचे सांगणार्‍या दिल्लीतील तीन महानगरपालिकांनी दिलेल्या माहितीपेक्षा ही माहिती पूर्णपणे विसंगत आहे. दक्षिण एमसीडीने त्यांच्या क्षेत्रात २९७ स्पा सुरू असल्याची माहिती दिली आहे, नॉर्थ एमसीडीने त्यांच्या भागात १२७ स्पा सुरू असल्याचे सांगितले आहे आणि पूर्व एमसीडीने त्यांच्या क्षेत्रात ६० स्पा सुरू असल्याची माहिती दिली आहे.

बेकायदेशीर स्पा आणि मालिश केंद्र :
हे स्पष्ट आहे की राजधानीत हजारो स्पा आणि मसाज केंद्रे कोनत्याही रजिस्ट्रेशनशिवाय बेकायदेशीरपणे चालू आहेत. कंपनीने राजधानीमध्ये कार्यरत असलेल्या स्पाच्या अंदाजे संख्येविषयी माहिती दिली आहे, परंतु स्पाशी संबंधित डेटा सबमिट करण्यासाठी आणि सविस्तर माहिती देण्यासाठी ६ आठवडे मागितले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी असे म्हटले आहे की ते त्यांच्या धोरणांची तपासणी करीत आहेत आणि माहिती देण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेत आहेत कारण यात संवेदनशील किंवा वैयक्तिक माहिती असू शकते.

डेटा सबमिट करण्यासाठी २ आठवड्यांचा कालावधी :
सर्च इंजिनला पाठवलेल्या नव्या नोटीसमध्ये दिल्ली महिला आयोगाने सर्च पोर्टलला डेटा गोळा करून आयोगाकडे देण्यास २ आठवड्यांची मुदत दिली आहे. मागविलेली माहिती वैयक्तिक आणि संवेदनशील असल्याच्या कंपनीच्या मताशी आयोग पूर्णपणे सहमत नाही. १७ ऑक्टोबरपर्यंत कमिशनने सर्च इंजिनकडून संपूर्ण माहिती मागितली आहे.

मसाज आणि स्पा पार्लरच्या नावाखाली राजधानीत कार्यरत असलेल्या अनेक अवैध लैंगिक रॅकेटचा खुलासा करण्यासाठी सर्च इंजिनवर नोंदणीकृत स्पा आणि मसाज सेंटरबद्दल दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. असे असूनही आजपर्यंत तीनही एमसीडीने परवाना देण्याची प्रक्रिया बदलली नाही किंवा राजधानीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटला काम थांबविण्याचा सल्लाही दिला नाही.

काय म्हणाल्या स्वाती मालीवाल :
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘दिल्लीत ५००० हून अधिक अनधिकृत स्पा सेंटर्स सुरू आहेत मात्र एमसीडी ५०० पेक्षा कमी परवाने हक्क सांगत आहे ही विचार करणारी बाब आहे. तसेच, एमसीडीची परवाना प्रक्रिया म्हणजे एक विनोदच आहे, परवाना देण्यापूर्वी एमसीडीकडून कोणतीही प्रत्यक्ष तपासणी केली जात नाही.

तसेच स्वाती मालीवाल काय म्हणाले, ‘राजधानीत अनेक बेकायदा स्पा कार्यरत आहेत याचा आणखी पुरावा काय हवा ? तसेच आजतागायत कोणत्याही एमसीडीतर्फे क्रॉस-जेंडर मालिशसंदर्भात कोणतीही नियमावली देण्यात आलेली नाही. राजधानीत लैंगिक रॅकेट चालविणाऱ्या अशा अवैध स्पा सेंटरांवर कडक कारवाई केली जावी.

visit : Policenama.com