नरेंद्र दाभोलकाराची हत्या करणाऱ्या मास्टर माईंडचा शोध घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधी कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांची हत्या करण्यात आली आहे. तरी देखील अद्याप पर्यंत या सर्वांच्या हत्या मागील मास्टर माईंड सापडला जात नाही. अशी खंत अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. तर या हत्या मागील मास्टर माईंड सापडला पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’67cb4717-a434-11e8-bebf-cff2ea4a89e4′]

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण होत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या दरम्यान जवाब दो या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर या रॅली दरम्यान हमीद दाभोलकर यांनी भूमिका मांडली.तर या रॅलीमध्ये मुक्ता दाभोलकर, मेधा पानसरे, तुषार गांधी, कामगार नेते बाबा आढाव, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी अनेकांनी त्यांचे मनोगत देखील व्यक्त केले.