पठानकोटमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने ‘हायअलर्ट’, ‘सर्च ऑपरेशन’ राबवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पठानकोटमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. गुरुवारी पंजाब आणि हिमाचल पोलिसांकडून दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित डमटालच्या पर्वतांत तसेच जंगलात शोध मोहिम राबवण्यात आली. पंजाब पठानकोटचे सिटी डीएसपी राजेंद्र मन्हास आणि हिमाचलचे डीएसपी नूरपूर डॉ. साहिल अरोडा यांच्या नेतृत्वात पाच ठाण्याचे प्रभारी आणि चौकी प्रभारी मोठ्या संख्येने तेथे पोहचून त्यांनी जंगलाचा कोपरान कोपरा तपासला. परंतू त्यांना कोणतीही संशयित वस्तू अथवा व्यक्ती सापडला नाही.

हे पर्वत पठानकोट एअरबेसपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच डमटाल पर्वत आणि जंगलाच्या जवळ सैन्याचे फायरिंग रेंज आहे. जेथे सैन्य आणि अधिकारी प्रॅक्टिस करतात. पठानकोटमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची माहीत कळाल्यावर एसएसपी दिपक हिलोरी यांच्या सूचनेनुसार दोन्ही राज्यांच्या पोलिसांना शोध मोहिमेवर पाठवले.

पोलिसांच्या एका टीमने जंगल भागातील रहिवाशांच्या घरात देखील शोध घेतला. या दरम्यान काहीही संशयास्पद सापडले नाही. रहिवाशांना पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. डीएसपींचे म्हणणे आहे की जंगल भागात अनेक समाजकंटक आपले ठिकाण बनवू शकतात. ते म्हणाले की सणाचे दिवस आहे, पोलीस सुरक्षेसंबंधित गंभीर आहेत. भविष्यात देखील अशाच प्रकारचे सर्च ऑपरेशन राबवण्यात येतील.

19 वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी निवडला होता डमटाल भाग
1 जानेवारी 2001 साली डमटालच्या फायरिंग रेंजवर दहशतवाद्यांना हल्ला केला होता. दहशतवादी डमटालच्या पर्वतीय भागात होते. हल्ला होण्याआधी दहशतवाद्यांना काही लाकडे जमा करणाऱ्या महिलांनी पाहिले होते. या दरम्यान पोलिसांनी पर्वतीय भागात शोध मोहिम राबवली होती परंतू दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात यश आले नाही. 2001 साली नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी जेव्हा सैनिक फायरिंगची प्रॅक्टिस करत होते तेव्हा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

Visit : Policenama.com