Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! जाणून घ्या कोणत्या स्कीम्समध्ये होणार बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यूचुअल फंड कंपन्यांना सेबीने(SEBI) त्यांच्या डिविडेंड प्लॅनची नावे बदलण्यास सांगितले आहे. यामध्ये सध्याची एक आणि नवीन दोन योजनांचा सामावेश आहे. सेबीने फंड हाउसच्या गुंतवणुकदारांना स्पष्ट करायला सांगितले आहे की त्यांच्या बचतीचा काही हिस्सा डिविडेंड स्वरुपात ते देत आहेत. फंड हाउस डिविडेंट पर्यायात तीन विकल्प देतात. चालू असलेल्या प्रत्येक स्कीमसोबत नवीन फंड आफरसाठी या तीन्हींची नावे बदलायला सांगितली आहेत.

यांची बदलतील नावे –
डिविडेंट पेआउट ऑप्शनचे नाव पेआउट ऑफ इनकम डिस्ट्रीब्यूशन कम कैपिटल विदड्रॉल ऑप्शन केलं जाणार आहे. तसेच डिविडेंड रीइनवेस्टमेंटचं नाव बदलून रीइनवेस्टमेंट ऑफ इनकम डिस्ट्रीब्यूशन कम कैपिटल विदड्रॉल प्लान केले जाणार आहे. डिविडेंड ट्रान्सफरचे नाव ट्रांसफर ऑफ इनकम डिस्ट्रीब्यूशन कम कैपिटल विदड्रॉल प्लान (Capital Withdrawal Plan) केले जाणार आहे.

गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे –
डिस्ट्रीब्यूटरच्या मते अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत जिथं इक्वीटी आणि हाइब्रीड उत्पादनांचे नियमित डिविडेंड देण्यात येईल असं सांगून ते विकून टाकले आहेत. बरेच गुंतवणुकदार धोका न बघता अशा स्कीममध्ये पैसे गुंतवत असतात. ज्यावेळेस बाजारात मोठी मंदी येते त्यावेळेस पैसे गुंतवणुदारांना पैसे माघारी मिळण्यास अडचणी येतात.

म्यूचअल फंड कंपन्यांना इनकम डिस्ट्रीब्यूशन आणि कॅपिटल डिस्ट्रीब्यूशन वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. इनकम डिस्ट्रीब्यूशन नेट एसेच वॅल्यूची अधिकता असते. दोन्ही प्रकारच्या डिस्ट्रीब्यूशनचे एसेच मॅनेजमेंट कंपनींना कंसोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट देणं महत्वाचं आहे.