शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! अर्थ मंत्रालय बदलू शकते ‘हा’ नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनचा विचार करता शेअर बाजारातील ट्रेडिंग टाइम (TRADING TIME) कमी करण्यावर अर्थ मंत्रालय आणि सेबी (SEBI) विचार करत आहे. सूत्रांच्या मते अर्थ मंत्रालय आणि सेबी शेअर मार्केट बंद करण्याचा पर्याय देखील स्वीकारु शकते. ट्रेडिंग वेळ कमी केल्याने ब्रोकिंग स्टाफ वरील दबाव कमी होईल. शेअर बाजार बंद करण्याच्या पर्यायावर देखील विचार केला जात आहे. यामुळे ब्रोकिंग स्टाफ सेम डे सेटलमेंट, बँक क्लिअरिंग करण्यास सोपे होईल. बाजार बंद करण्याच्या स्थितीत F&O एक्सपायरीची तारीख रुपांतरित केली जाऊ शकते. यावर अद्याप अर्थ मंत्रालय आणि सेबीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी उद्योग क्षेत्र देखील एकजूट
कोरोनाच्या विरोधात उद्योग क्षेत्र देखील एकजूट झाले आहे. कोरोनासारख्या महामारीशी लढण्यासाठी अनिल अग्रवाल 100 कोटी रुपये देणार आहेत, आनंद महिंद्रा म्हणाले आम्ही आमच्या फ्रेट्रिकमध्ये वेंटिलेटर तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. ITC, GODREJ CONSUMER, HUL ने सॅनिटाईजरचे दर कमी केले आहेत. HUL ने 100 कोटी देण्याची घोषणा केली आहे.

10 ते 2 वाजेपर्यंत सुरु असणार बँका
आज बाजारात सामान्य ट्रेड राहिला. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. कमोडिटी आणि करेंसी बाजारात सामान्य कामकाज सुरु राहिलं. असे असले तरी ICICI, HDFC, KOTAK सारख्या बँका सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

शॉर्ट सेलिंगच्या नियमात मोठे बदल
सेबीने शॉर्ट सेलिंगच्या नियमात कठोर बदल केले आहेत, सेबी STOCKS FUTURES मध्ये पोजिशन लिमिट कमी करुन 50 टक्के केले आहे. Index Short वर सख्तीसह कॅशची मार्जिन देखील वाढवली आहे.

ऑटो कंपन्यांनी निर्मिती केली बंद
कोरोनाचा विचार करता ऑटो कंपन्यांनी वाहनांची निर्मिती (प्रोडक्शन) बंद केली आहे. मारुती कंपनीने हरियाणाच्या मानेसर प्लॅंटमध्ये उत्पादन थांबवले आहे, महिंद्राचे नागपूर, पुणे, बोरिवली प्लॅंट शटडाऊन केले आहेत. हीरो मोटोने जगभरातील आपले मॅन्युफॅक्चरिंग यूनिट बंद केले आहेत.