खुशखबर ! SEBI ने बदलला नियम, आता share market मध्ये गुंतवणूक करणार्‍यांना मिळेल ‘कमाई’ची संधी

नवी दिल्ली : शेयर बाजार रेग्युलेटर म्हणजेच सेबीने शेयर मार्केटच्या PREFERENTIAL ALOTTMENT नियमांमध्ये बदल करत निर्णय घेतला आहे की, इन्व्हेस्टर्स 10 टक्केपर्यंत असे शेयर घेऊ शकतात. शेयर मार्केटचा हा नियम बदलल्याने शेयर बाजारात जास्त गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. या नियमामुळे आता कंपनी प्रमोटर्स कंपनीचे जास्त शेयर्स घेऊ शकतील, ज्याचा अर्थ आहे की, जास्त गुंतवणूक. यापूर्वी प्रिफरेशियल शेयर्स केवळ 5 टक्केच घेता येत होते.

जाणून घेवूयात अखेर हे नियम काय असतात आणि ते बदलल्यामुळे लोक इतके खुश का आहेत…

’प्रेफरन्स शेयर’ – काणेतीही कंपनी आपल्या निवडक गुंतवणुकदारांना आणि प्रमोटर्सना शेयर जारी करते. या शेयर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार इक्विटी शेयर होल्डरपेक्षा जास्त सुरक्षित असतात. कोणतीही कंपनी गोत्यात येत असेल तर अशा प्रकारच्या शेयरधारकांना अन्य इक्विटी शेयरधारकांच्या तुलनेत पैसे देण्याच्या बाबतीत प्राधान्य दिले जाते. याच कारणामुळे ’प्रेफरन्स शेयर’ सुरक्षित मानले जातात. एवढेच नव्हे, जर कंपनीला कोणताही फायदा झाला तर लाभ सुद्धा सर्वप्रथम याच शेयर होल्डर्सला दिला जातो.

प्रेफरन्स शेयरमध्ये डिव्हिडंटचा दर अगोदरच ठरलेला असू शकतो. अशा प्रकारे जास्त सुरक्षा असते. प्रेफरन्स शेयर्सना सामान्य शेयरमध्ये बदलता येते. त्या स्थितीत त्यांना कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेयर म्हणतात.