सुवर्णसंधी ! 1 कोटी जिंकण्यासाठी फक्त ‘हे’ काम करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही व्यापारी कंपनीबाबत अंतर्गत माहिती (Insider Trading) बद्दल सूचना देणाऱ्यांना शेअर मार्केट (सेबी) तर्फे १ करोड रुपयांचे बक्षिस मिळू शकते. त्याचप्रमाणे माहिती गोपनीय ठेवण्यासाठी हॉटलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तपासणीसाठी सहयोग दिल्याबद्दल छोट्या छोट्या चुकांमधून माफी दिली जाणार आहे. सेबीने नुकतेच अवैध ट्रेडींग करणाऱ्यांबाबत नवीन नियमावली बनवली आहे. या नियमांना याच महिन्यात मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

यांना मिळू शकणार नाही बक्षिस –
ही सुविधा फक्त कंपन्या आणि लोकांसाठी आहे. मात्र ऑडिटर स्वरूपाचे काम करणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही. कारण फायद्याबाबतच्या पैशांबाबत पाठपुरावा करण्याची आणि त्यांना उत्तरे देण्याची जबाबदारी ऑडिटरचीच आहे.

इनसाईडर ट्रेडींग म्हणजे नक्की काय ?
सेबी कंपन्यांच्या हितासाठी आणि रक्षणासाठी इनसाईडर ट्रेडींगवरती बंदी घालते, किंमतीशी निगडित अप्रत्यक्षिक माहिती आपल्याकडे ठेऊन समोरच्यांसोबत व्यापार करणे म्हणजे इनसाईडर ट्रेडींग करणे होय. आधीच माहिती असल्यामुळे यात फायदाच होतो आणि पैशांच्या अफरातफरीचा विषय होऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त