SEBI नं गुंतवणुकदारांसाठी 17 मुद्यांव्दारे जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या डिटेल अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली : ‘सेबी’ने गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी (investor safety) काही महत्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली (SEBI issued 17 points in guideline) आहेत. सेबी ने आपल्या सर्क्युलर मध्ये म्हटले आहे की, गुंतवणुकदारांनी या निर्देशांचे अनिवार्य पालन करावे, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. सेबीने काही दिवसांपूर्वीच महत्वाच्या नियमांमध्ये सुद्धा बदल केले आहेत (SEBI has also made changes in important rules). सेबी ने 17 पॉईंटमध्ये या गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत.

गुंतवणुकदारांनी काय करावे आणि काय करू नये (What investors should and should not do) :

1. केवळ रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकर (Registered stock broker) सोबतच व्यवहार/करार करा – ज्या ब्रोकरसह व्यवहार करत आहात, त्याचे रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तपासून घ्या.

2. फिक्स्ड/गॅरंटीकृत/नियमित रिटर्न/कॅपिटल प्रोटेक्शन प्लान्सपासून सावध रहा. ब्रोकर किंवा त्यांचे अथॉराइज्ड व्यक्ती किंवा त्याचा कुणीही प्रतिनिधी/कर्मचारी तुमच्या इन्व्हेस्टवर फिक्स्ड/गॅरंटीकृत/नियमित रिटर्न/कॅपिटल प्रिजर्व्हेशन देण्यासाठी अथॉराइज्ड नाही.

तसेच तुम्ही दिलेल्या पैशावर व्याज देण्यासाठी तुमच्या सोबत कोणताही कर्ज करार करण्यासाठी अथॉराइज्ड नाही. कृपया लक्षात ठेवा तुमच्या खात्यात अशाप्रकारचा कोणताही व्यवहार आढळल्यास तुमचा दिवाळखोर/निलंबित ब्रोकर संबंधी दावा अपात्र ठरवला जाईल.

3. कृपया ‘केवाईसी’ पेपरमध्ये सर्व आवश्यक माहिती स्वता भरा आणि ब्रोकरकडून ‘केवाईसी’ पेपरची नियमानुसार साईन केलेली प्रत प्राप्त करा. या सर्व अटींची तपासणी करा ज्यास तुम्ही सहमती आणि स्वीकृती दिली आहे.

4. हे तपासून घ्या की, स्टॉक ब्रोकरकडे नेहमी तुमचे नवीन आणि योग्य कॉन्टॅक्ट डिटेल असतील, जसे की, ईमेल आयडी/मोबाइल नंबर. हे नियमित अपडेट करत राहा. एक्सचेंज/डिपॉझिटरीकडून नियमित मेसेज मिळत नसतील तर स्टॉक ब्रोकर/एक्सचेंजकडे प्रकरण न्या.

5. इलेक्ट्रॉनिक (ई-मेल) कॉन्ट्रॅक्ट नोट्स/फायनान्शियल डिटेल्सची निवड केवळ तेव्हाच करा जेव्हा स्वताला कम्प्युटरची माहिती असेल. आणि तुमच्या नावाने ई-मेल अकाऊंट असेल आणि तुम्ही ते दररोज/नियमित पहात असाल.

6. तुम्ही केलेल्या ट्रेडसाठी एक्सचेंजकडून प्राप्त कोणत्याही ईमेल/एसएमएसकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या ब्रोकरला भेटा. कॉन्ट्रॅक्ट नोट/अकाऊंटच्या डिटेलसोबत व्हेरिफाय करा. जर काही गडबड असेल तर ब्रोकरला ताबडतोब याबाबत लेखी कळवा आणि जर स्टॉक ब्रोकर उत्तर देत नसेल तर एक्सचेंज/डिपॉझिटरीला ताबडतोब रिपोर्ट करा.

7. तुमच्याकडून ठरवलेल्या अकाऊंटच्या सेटलमेंटची फ्रिक्वेन्सी तपासा. जर तुम्ही करंट अकाऊंटचा पर्याय निवडला असेल, तर कृपया कन्फर्म करा की तुमचा ब्रोकर तुमच्या अकाऊंटची नियमित प्रकारे सेटलमेंट करत आहे आणि कोणत्याही स्थितीत 90 दिवसांत एकदा (जर तुम्ही 30दिवसांच्या सेटलमेंटचा पर्याय निवडला आहे तर 30 दिवस) डिटेल्स पाठवत आहे. कृपया लक्ष द्या की, तुमच्या ब्रोकर डिफॉल्ट होण्याच्या स्थितीत एक्सचेंज द्वारे 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे दावे स्वीकारले जाणार नाहीत.

8. डिपॉझिटरीकडून प्राप्त जॉईंट अकाऊंटची माहिती (Consolidated Account Statement- CAS) नियमित प्रकारे व्हेरिफाय करत रहा आणि आपल्या ट्रेड/व्यवहारांसोबत सामंजस्य ठेवा.

9. कन्फर्म करा की, पे-आऊटच्या तारखेपासून 1 वर्किंग डेच्या आत तुमच्या खात्यात रक्कम/सिक्युरिटी (शेयर) चे पेमेंट झाले आहे. कन्फर्म करा की तुम्हाला तुमच्या ट्रेडचे 24 तासांच्या आत कॉन्ट्रॅक्ट नोट मिळतात.

10. एनएसईच्या वेबसाइटवर ट्रेड व्हेरिफिकेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे ज्याचा वापर आपल्या ट्रेडच्या व्हेरिफिकेशनसाठी करू शकता.

11. ब्रोकरकडे अनावश्यक बॅलन्स ठेवू नका. कृपया लक्षात ठेवा की ब्रोकर दिवाळखोर ठरल्यास त्या खात्यांचे
दावे स्वीकारले जात नाहीत, ज्यामध्ये 90 दिवसात कोणताही ट्रेड झालेला नाही.

12. ब्रोकर्सला सिक्युरिटी ट्रान्सफर मार्जिनच्या रूपात स्वीकरण्यास परवानगी नाही. मार्जिनच्या रूपात दिली
जाणारी सिक्युरिटी ग्राहकाच्या अकाऊंटमध्येच राहिली पाहिजे आणि ती ब्रोककडे गहान ठेवली जाऊ शकते.
ग्राहकाला कोणत्याही कारणाने ब्रोकर किंवा ब्रोकरचा सहकारी किंवा ब्रोकरच्या अथॉराइज्ड व्यक्तीकडे

कोणतीही सिक्युरिटी ठेवण्याची परवानगी नाही. ब्रोकर केवळ कस्टमरद्वारे विकल्या गेलेल्या सिक्युरिटीचे डिपॉझिट करण्यासाठी ग्राहकांशी संबंधीत सिक्युरिटी घेऊ शकतात.

13. मोठ्या नफ्याचा वादा करणारे शेयर/सिक्युरिटीत व्यापार करण्याचे अमिष दाखवून ईमेल आणि
एसएमएस पाठवून फसवणूक करणार्‍यांपासून सावध राहावे. कुणालाही आपला यूजर आयडी आणि पासवर्ड
देऊ नका. तुमचे सर्व शेयर किंवा बॅलन्स शून्य होऊ शकते. हे सुद्धा होऊ शकते की, तुमच्या खात्यात मोठ्या
रक्कमेची वसूली निघू शकते.

14. पीओए (पावर ऑफ अ‍ॅटर्नी) देताना सावध रहा – सर्व अधिकार ज्यांचा स्टॉक ब्रोकर वापर करू शकतात
आणि कालावधी ज्यासाठी पीओए मान्य आहे, त्यास स्पष्ट सांगा. हे लक्षात ठेवा की सेबी/एक्सचेंजनुसार
पीओए अनिवार्य / आवश्यक नाही.

15. ब्रोकरद्वारे रिपोर्ट करण्यात आलेले फंड आणि सिक्युरिटी बॅलन्सबाबत साप्ताहिक आधारावर
एक्सचेंजद्वारे पाठवण्यात आलेल्या एसएमएसची तपासणी करा आणि जर तुम्हाला यात काही तफावत
आढळली तर ताबडतोब एक्सचेंजकडे तक्रार करा.

16. कुणासोबतही पासवर्ड (इंटरनेट अकाऊंट) शेयर करू नका. असे केल्याने सुरक्षित पैसे शेयर करण्यासारखे आहे.

17. कृपया सेबीच्या रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकरशिवाय कोणत्याही अथॉराइज्ड व्यक्ती किंवा ब्रोकरचा सहयोगीसह कुणालाही ट्रेडिंगच्या उद्देशाने फंड ट्रान्सफर करू नका.

 ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  SEBI | sebi new guidelines for investors know everything

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update