भाजपची 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, खडसे, तावडे, बावनकुळे दुसऱ्या यादीतही नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने आपली 125 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केल्यानंतर दुसऱ्या यादीची प्रतिक्षा होती. भाजपने आज 14 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, शिवसेना, मनसे, वंचित, एमआयएम पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आज दुसरी यादी जाहीर केल्याने राज्यातील काही जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर केली असली तरी शिवसेनेने आपली दुसरी यादी जाहीर केली नाही. पहिल्या यादीत नसलेल्या एकनाथ खडसे यांचे नाव नाही. तसेच विनोद तावडे आणि चंद्रकांत बानवकुळे यांचे देखील नाव नसल्याने या तिघांचे तिकीट कापण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे आणि कंसात मतदारसंघ….
1 मोहन गोकुळ सुर्य़वंशी (साकरी)
2 प्रतापदादा अडसद (धामनगाव रेल्वे)
3 रमेश मावसकर (मेळघाट)
4 गोपालदास अग्रवाल (गोंदिया)
5 अमरीश राजे अतराम (अहेरी)
6 निलय नाईक (पुसत)
7 नामदेव ससाणे (उमरखेड)
8 दिलीप बोरसे (बागलान)
9 कुमार उत्तमचंद ऐंलानी (उल्हासनगर)
10 गोपीचंद पडळकर (बारामती)
11 संजय बाळा भेगडे (मावळ)
12 नमिता मुंदडा (केज)
13 शैलेश लाहोटी (लातूर शहर)
14 डॉ. अनिल कांबळे (उदगीर)

Visit : Policenama.com