Coronavirus : विदर्भात ‘कोरोना’चा दुसरा बळी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावतीमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला असून विदर्भातील मृतांची संख्या दोन झाली आहे. कोरोनाच्या संशयावरुन एका व्यक्तीला २ एप्रिलला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पण त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता या रुग्णाचा मृत्यु झाला.

शनिवारी पहाटे ३ वाजता त्याचा अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हैदरपुरा परिसर पूर्णपणे सील केला आहे. त्याच्याशी संपर्कात असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे नमुने घेऊन ते तपासणीला पाठविण्यात आले आहे. या रुग्णाच्या मृत्युमुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या आता वाढली आहे.