Covishield चा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीमधील कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पहिला आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी 12 ते 16 आठवडे ठेवता येणार आहे. सध्या हा गॅप 6 ते 8 आठवडे असा होता. कोरोना लसीचा तुटवडा देशभरात निर्माण झाला. वर्किंग ग्रुपनं केलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, कोवॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी मात्र वाढवण्यात आलेला नाही.

ब्रिटनमध्ये उपलब्ध रियल लाईफ एविडन्सच्या आधारे वर्किंग ग्रुपनं कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. ती सरकारनं मंजूर केली आहे. मात्र, कोवॅक्सिनबाबत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर 6 महिन्यांनी लस घ्यावी

ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जे बरे झाले आहेत त्यांनी देखील लगेचच कोरोना लस घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नसल्याचे वर्किंग ग्रुपनं म्हटलं आहे. अशा लोकांनी बरं झाल्यापासून सहा महिन्यात लस घ्यावी, असं या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागर समिती (NTAGI) ने सुचवलं आहे. गरोदर असलेल्या महिलांना केणतीही लस निवडण्याची मुभा आहे. तसेच प्रसुती झाल्यानंतर महिला कधीही लस घेऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले आहे.