एमआयटी पुणे तर्फे ऑनलाइन दुसरी राष्ट्रीय महिला संसद 11 जानेवारीपासून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-  एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे चार दिवसीय ऑनलाईन दुसरी राष्ट्रीय महिला संसद दि. ११ ते १४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महिलांमधील नेतृत्व ४.० : शक्ती, विकास आणि बदल (Women in Leadership 4.0: Power, Progress & Change.) हा या संसदेचा प्रमुख विषय आहे.

दुसर्‍या महिला संसदेचे उद्घाटन सोमवार, दि. ११ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २.०० होणार आहे. या समारंभासाठी माजी केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या राज्यापाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, खासदार डॉ. दिव्या कुमारी, सुप्रसिद्ध नृत्यंगणा पद्मभूषण डॉ. मल्लिका साराभाई, द कॉमन वेल्थच्या महासचिव पार्टीशिया स्कॉटलँड, पार्श्‍वगायक पद्मश्री कैलास खेर, आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती रितू छाब्रिया या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून दुसरी राष्ट्रीय महिला संसद भरवली जात आहे.

गुरूवार, दि. १४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वा.या महिला संसदेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, झारखंडच्या राज्यपाल श्रीमती द्रौपदी मुरमू , नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापकीय सदस्य व थोर समाजसेविका मेधा पाटकर, सेवाच्या संस्थापिका पद्मभूषण डॉ. ईलाबेन भट, आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या प्रमुख श्रीमती राजश्री बिर्ला, युकेच्या हाउस ऑफ लॉर्डच्या सदस्या संदीप के. वर्मा, खासदार प्रणित कौर, जम्मू येथील महाराजा हरिसिंग ट्रस्टच्या उपाध्यक्षा श्रीमती रितूसिंग हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महिला संसदेमध्ये नऊ सत्रे आयोजित केली आहेत