लडाखमध्ये तैनात भारताच्या ’सीक्रेट फोर्स’ चा जवान सन्मानित, चीनविरूद्ध राबवत आहेत ऑपरेशन स्नो लेपर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 72 व्या प्रजासत्तास दिनी भारताने अभिमानाने स्वीकार केले आहे की लडाखमध्ये चीनच्या कारस्थानांना उत्तर देण्यासाठी एक सीक्रेट फोर्स काम करत आहे. या सीक्रेट युनिटचे नाव स्पेशल फ्रंटियर फोर्स आहे. यावेळी या युनिटच्या एका जवानाला लडाखमध्ये चीनच्या विरूद्ध ऑपरेशनसाठी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष हे आहे की, या युनिटमध्ये तिबेटीयन सहभागी आहेत, जे आपल्या देशातून निर्वासित आहेत आणि भारतात राहात आहेत.

या युनिटचे जवान शेरिंग नोरबू यांचे ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये महत्वाच्या योगदानासाठी विशेष प्रकारे स्मरण केले गेले आहे. आता पूर्व लडाखमध्ये चीनविरूद्ध जारी भारताच्या ऑपरेशनला ऑपरेशन स्नो लेपर्ड नाव देण्यात आले आहे.

शेरिंग नोरबू त्या 54 जवानांमध्ये सहभागी आहेत, ज्यांना ऑपरेशन स्नो लेपर्डसाठी सन्मानित करण्यात आले आहे. लडाखच्या ताज्या घटनेपूर्वी भारत हे ऑपरेशन गुप्त पद्धतीने करत होते, परंतु भारताने आता या युनिटच्या अस्तित्वाला गर्वाने स्वीकारले आहे.

भारताने 1962 मध्ये चीन युद्धानंतर सीक्रेट स्पेशल फ्रंटियर फोर्सची स्थापना केली होती. भारतात राहात असलेल्या तिबेटीयन या युनिटचे सदस्य आहेत. यानंतर या युनिटने 1971 युद्ध, करगिल युद्धासह अनेक ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता.

स्पेशल फ्रंटियर फोर्स (एसएफएफ) आता चीनची कारस्थानं आणि कटांच्या विरूद्ध लडाखमध्ये काम करण्यासाठी तैनात आहे. याच युनिटचे सुभेदार नइमा तेंजिंग दक्षिणी पँगोंग सरोवरात एका लँडमाइनच्या स्फोटात जखमी झाले होते, नंतर त्यांचा मृत्यू झाला होता.

जेव्हा सुभेदार नइमा तेंजिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यावेळी तिबेटीयन समुदायाशिवाय भारतीय लष्कराचे अधिकारी सहभागी झाले होते. कदाचित ही पहिली वेळ होती जेव्हा भारताने या युनिटचे अस्तित्व जाहीर प्रकारे स्वीकारले होते.

एसएफएफचा आणखी एक जवान तेंजिंग लांडेन सुद्धा चुसुलमध्ये एका लॅडमाइनमध्ये जखमी झाला होता, नंतर तो बरा झाला.

भारत अगोदर स्पेशल फ्रंटियर फोर्सची जास्त चर्चा करत नव्हता, परंतु लडाखमध्ये नुकत्याच झालेल्या बॉर्डर वादानंतर या युनिटच्या शौर्याची चर्चा भारत जाहीर प्रकारे करू लागला आहे.