अन… उदयनराजे बसण्यासाठी गेले पवारांच्या गाडीत : दोघांमध्ये गुप्त बैठक 

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार आणि साताऱ्याचे  खासदार उदयनराजे यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाल्यामुळे सर्वानी भुवया उंचावल्या . गेल्या काही काळापासून कोलार उडवल्यावरून वक्तव्ये केली होती. आता या भेटीदरम्यान या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहेत . असे असले तरी याबाबत सूचक ओढणे उदयन राजे यांनी केली आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b99688ef-be33-11e8-8060-c960618144fb’]

 या भेटीबाबत बाबत उदयन राजेंना विचारले असता त्यांनी पवार यांनी आपल्याला कडकडून मिठी मारल्याचे सांगितले. ‘तुम्ही आमचेच आहात. नंतर बोलू. मी पण सांगितलं. कसं आहे, राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.’ असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला.

 अन्…उदयनराजे पवारांच्या गाडीत

 

चर्चेतून बाहेर पडताना उदयन राजेंनी चुकुन शरद पवार यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. मात्र, चालकाकडे पाहून त्यांना ही आपली गाडी नसून पवार साहेबांची असल्याचे कळताच माघारी परतले. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. मात्र, उदयन राजेंनी ‘साहेबांची गाडी आहे. एवढं काय…कलर एकच आहे. वाटले आपली गाडी.’ असे म्हणत वेळ मारून नेली.

चार वर्षांतील पाच लोकहिताची कामे सांगा; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश

शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी साताऱ्याच्या दोन्ही राजांदरम्यान असलेला विसंवाद दूर करण्यासाठी पुण्यात समेट घडवून आणला होता. यावेळी दोन्ही राजांनी पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. मात्र, ही शिष्टाई यशस्वी झाल्याचे वाटत असतानाच पुन्हा वर्चस्व वादाने उसळी घेतली व साताऱ्याचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे.

[amazon_link asins=’817992162X,0062641549′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64e41d50-be37-11e8-8b4e-53aab784a899′]