खुशखबर ! शास्त्रज्ञांनी शोधलं ‘तरूण’ राहण्याचं ‘गुपित’, मानवी शरीरामध्येच लपलाय ‘हा’ फॉर्म्युला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या तरूणपणाचे रहस्य आपल्या हाडांमध्ये लपलेले आहे. जर हाडांमध्ये विशिष्ट प्रकारच्या हार्मोनचे प्रमाण योग्य असेल, तर आपण म्हातारपणापासून वाचू आणि स्मृतीही कमकुवत होणार नाही. शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की, म्हातारपण पळवण्याचे रहस्य आपल्या हाडांमध्ये लपलेले आहे. यामध्येच जन्मलेल्या हार्मोनमुळे आपण तरूण राहू शकतो.

कोलंबिया विद्यापीठाच्या अनुवंशशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर गेरार्ड कार्सेन्टी हे गेल्या ३० वर्षांपासून हाडांमध्ये लपलेले रहस्य जाणून घेण्यासाठी संशोधन करत होते. त्यांना हाडांमध्ये तयार होणारे हार्मोन ऑस्टिओकॅलसीनवर संशोधनादरम्यान आढळले की, हे हाडांच्या आतल्या जुन्या ऊती (Old Tissue) काढून टाकते. आणि नवीन ऊतक बनवते.

ऑस्टिओकॅलसीन हार्मोनमुळे आपली लांबी वाढते. गेरार्ड यांनी उंदरांवर या संप्रेरकाच्या जीनचा अभ्यास केला त्यात असे दिसून आले की, हे हार्मोन आपल्या शरीराच्या अनेक प्रतिक्रियांवर परिणाम करतो.

प्रो. गेरार्ड कार्सेन्टी म्हणतात की, पूर्वी असा विश्वास होता की आपले शरीर केवळ हाडांच्या संरचनेने उभे असते, परंतु तसे नाही. हाडे आपल्या शरीरातील अधिक क्रियांवर परिणाम करतात.

हाडांच्या आतल्या ऊती आपल्या शरीरातील इतर ऊतींना सहकार्य करतात. हाडे स्वत:चे हार्मोन्स बनवतात, जे इतर अवयवांसाठी सिग्नल पाठवण्याचे काम करतात. याच्या मदतीनेच आपण व्यायाम करतो.

हे म्हातारपण टाळण्यास आणि स्मरणशक्ती वाढवण्यात मदत करते. प्रो. गेरार्ड कार्सेन्टी म्हणतात की, वृद्धत्व टाळण्यासाठी शरीरात ऑस्टिओकॅलसीन वाढवण्याशिवाय पर्याय नाही. नियमित व्यायामाने हाडे त्यांचे ऑस्टिओकॅलसीन तयार करण्यास सुरवात करतात.

हे हार्मोन दीर्घकाळ शरीरात टिकून राहील आणि वृद्धावस्थेच्या आजारांपासून त्याचे संरक्षण करू शकेल, यासाठी वैज्ञानिक ऑस्टिओकॅलसीन औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वृद्ध उंदरांवर केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, ब्लड प्लाझ्माचा अर्धा भाग काढून त्याजागी जर सलाइन आणि एल्बयुमिनमध्ये बदलला तर वृद्धत्वाची प्रक्रिया उलट होते.

या प्रक्रियेमुळे स्नायू, मेंदू आणि यकृत ऊती पुन्हा तरुण होऊ लागतात. हा सुधारित ब्लड प्लाझ्मा वयाशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरेल की नाही, याचा निष्कर्ष काढण्यासाठी आता रिसर्च टीम काम करत आहे.