Secret Weight Loss Meal | करीना कपूर खान ते मलायका अरोरा, जाणून घ्या 6 बॉलिवूड अभिनेत्रींचे ‘सीक्रेट वेट-लॉस मील’

नवी दिल्ली : Secret Weight Loss Meal | तंदुरुस्त राहणे ही अनेक सेलिब्रिटींसाठी गरजेची बाब आहे, कारण यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची त्यांची क्षमता वाढते. कठोर आहार आणि इंटेस वर्कआउटद्वारे ते नेहमी सक्रिय राहतात, जेणेकरून पडद्यावर अभिनय करण्याच्या त्याच्या समर्पणात कधीही अडथळा येऊ नये. फिट राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या गरजा असतात. यासाठी काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी निवडलेल्या सीक्रेट वेट लॉस मील वर एक नजर टाकूया. (Secret Weight Loss Meal)

१. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)

करीना कपूर ही एनर्जीचे एक पॉवर हाऊस आहे. प्रत्येक परफॉर्मन्समध्ये, ती इतरांपेक्षा काहीतरी नवीन आणि अद्वितीय करण्यासाठी ओळखली जाते. तिच्या परिपूर्ण शरीराने, तिने काही वेळातच तिच्या चाहत्यांची मने जिंकली. फिटनेस राखण्यासाठी, ती सर्व काही ताजे खाते आणि भरपूर रिफाइंड घटक असलेले अन्न टाळते. मात्र, एक गोष्ट जी तिला नेहमी तंदुरुस्त राहण्यास मदत करते, भूक भागवते आणि कॅलरीज राखते, ती म्हणजे खिचडी किंवा तांदळाचे दलिया. (Secret Weight Loss Meal)

२. मलायका अरोरा (Malaika Arora)

मलायका अरोराने लाखो महिलांना तंदुरुस्त राहण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित केले आहे. केवळ व्यायामाद्वारेच नाही तर ती तिच्या आहारातूनही स्वतःला तंदुरुस्त ठेवते. तिला स्वतःसाठी हेल्दी फूड बनवायला आवडते. मलायका तिच्या जेवणात भरपूर द्रवपदार्थ घेते.

३. कतरिना कैफ (Katrina Kaif)

संपूर्ण बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या अतुलनीय फिटनेससाठी ओळखल्या जाणा‍री कतरिना कैफ हिला परिचयाची गरज नाही. मग तिचा आकर्षक डान्स असो, अ‍ॅक्शन सीक्वेन्स असो किंवा तिचे सौंदर्य असो. कतरिनाला प्रेक्षकांच्या हृदयात स्थान कसे निर्माण करायचे हे माहीत आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की ती मॅक्रोबायोटिक आहाराचे काटेकोरपणे पालन करते आणि सर्व प्रकारचे कार्ब्स टाळते. रोजच्या जेवणात ती सूप आणि ग्रील्ड फिश यांसारख्या साध्या गोष्टी घेते.

४. भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)

Advt.

भूमी पेडणेकर तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि तितक्याच डाउन टू अर्थ व्यक्तिमत्त्वामुळे सर्व वयोगटातील
प्रेक्षकांना आवडते. तिने कमी केलेले वजन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
भूमी सर्व काही खाते जे निरोगी आहे. ती जेवणात सूर्यफुलाच्या बियांसह एक वाटी मुसळी आणि दूध घेते.

५. सुष्मिता सेन (Sushmita Sen)

सर्वात मोहक आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक, सुष्मिता सेनने नेहमीच तिच्या स्वतःच्या नियमांनुसार
जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग बनवला आहे. तिचे सुंदर स्मित आणि सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी,
ती तंदुरुस्त राहते. ती केवळ व्यायामातूनच नव्हे तर आहारातूनही निरोगी राहते.
ती जेवणात एक कप आल्याचा चहा, अंड्याचा पांढरा भाग, दलिया आणि एक ग्लास ताज्या भाज्यांचा रस घेते.

६. सारा अली खान (Sara Ali Khan)

आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना थक्क करणारी सारा अली खान फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अभिनयासह, तिचे सर्वात जास्त लक्ष तिच्या फिटनेसकडे असते. तिचे वजन कमी करणे प्रेरणादायी आहे.
तंदुरुस्त राहण्यासाठी तिच्या सीक्रेट मिलमध्ये भात, चपाती, डाळ, भाजी आणि कोशिंबीरचा समावेश आहे.

Web Title :- Secret Weight Loss Meal | kareena kapoor khan to malaika arora know the secret weight loss meal of 6 bollywood actresses

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Article 144 | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रकरणी कोल्हापुरात 144 कलम लागू

Vasant More | वसंत मोरेंची नाराजी दूर करायला अमित ठाकरेंची मध्यस्थी; नाराजी दूर होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष