उत्तर पूर्व दिल्लीत एक महिन्यासाठी कलम 144 लागू, हिंसाचारात 7 जणांचा ‘मृत्यू’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – उत्तर पूर्व दिल्लीत हिंसक घटनेत मृतक झालेल्यांची संख्या वाढून 7 झाली आहे. तर उत्तर पूर्व दिल्लीत 1 महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) संबंधित सोमवारी हिंसेत जीव गेलेल्या 7 जणांमध्ये दिल्ली पोलीसचे हेट कॉंस्टेबल रतनलाल याचा देखील समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की सोमवारी हिंसेत जीव गमावणाऱ्यांची संख्या चार होती, मंगळवारी ही संख्या वाढून 7 झाली आहे.

या हिंसाचारात 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी मंगळवारी सकाळी अनेक गाड्यांसह 5 दुचाकी आणि दुकानांना आग लावली. गोकलपुरी टायर मार्केटच्या 20 दुकानांना आग लावण्यात आली. सोमवारी उत्तर पूर्व दिल्लीमध्ये मोठी हिंसा झाली. यानंतर दिल्लीतील सात जागी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.