Section-144 in Mumbai And Thane | ठाणे, मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी; ‘या’ तारखेपर्यंत कडक बंदोबस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Section-144 in Mumbai And Thane | राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Maharashtra Political Crisis) होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे शिवसेना आणि शिंदे गट असा पेच निर्माण झाला आहे. यामुळे राज्यभर तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 10 जुलै पर्यंत जमावबंदीचे (Section-144 in Mumbai And Thane) आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

 

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जमाव किंवा गर्दी करता येणार नाही. दरम्यान, राज्यावर ओढावलेलं राजकीय संकट पाहता ठाणे जिल्हा प्रशासनानेही (Thane District Administration) कलम 144 अर्थात जमावबंदी लागू केले आहेत. ठाणे जिल्ह्यात 30 जूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या राजकीय मिरवणुकीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच, मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. (Section-144 in Mumbai And Thane)

 

मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश –

मुंबईतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्ताच्या सूचना

स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना

सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम बैठका इत्यादी ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना

सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरित देण्याचे आदेश

स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालींबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश

कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, तोडफोड करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश

कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

 

Web Title :- Section-144 in Mumbai And Thane | the ongoing political instability in maharashtra section 144 imposed in mumbai thane maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा