Inox मल्टीप्लेक्समध्ये चोरी करणारा सुरक्षा रक्षक गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये चोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरी केलेली दीड लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई मुंढवा येथील बी.जी. शिर्के कंपनीजवळ करण्यात आली. आतिश उद्धव कांबळे (वय-२४ रा. बी.जे. शिर्के कंपनीजवळ, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने पुणे स्टेशन येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समधून १ लाख ५६ हजार रुपये कॅशीअरची नजर चुकवून चोरून नेले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी आयनॉक्स मॉलचे सरव्यवस्थापक अंकूर कटपाल यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, आरोपी घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घराच्या जवळ सापळा रचला. आरोपी रात्री घराकडे येत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे, फिरोज शेख, नवनाथ रावडांगे, संतोष पगार, हरीष मोरे, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, श्रीधर सानप, निखील जाधव यांच्या पथकाने केली.

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात